वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात? मग आजच आहारात ‘हे’ पदार्थ घ्या
वपळीच्या आयुष्यात आपण सगळेच निरोगी राहण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतो. योगा, व्यायाम, मॉर्निंग वॉक आणि डाएटिंग अशा काही पद्धती आहेत.
मुंबई : धावपळीच्या आयुष्यात आपण सगळेच निरोगी राहण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतो. योगा, व्यायाम, मॉर्निंग वॉक आणि डाएटिंग अशा काही पद्धती आहेत. मात्र, आपल्याकडे असे अनेक लोक आहेत. ज्यांची वजन काढत नाहीत. कमी वजन असणे ही देखील मोठी समस्या आहे. अनेक प्रकारचे उपचार घेऊन सुध्दा वजन वाढत नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. (Follow these tips for weight gain)
केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. तसेच केळीमध्ये साधारण 130 कॅलरी असतात. दररोज सकाळी दोन केळी रिकाम्या पोटी खाल्ल्यातर आपले वजन वाढण्यास नक्की मदत होते.
तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. बरेच लोक तूप खाणे टाळतात कारण तूपामुळे लठ्ठपणा वाढतो. मात्र, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात तुप घ्यावे यामुळे वजन वाढण्यास मदत होईल.
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, कर्बोदकांमधे, प्रथिने आणि फायबर असतात. 100 ग्रॅम बटाटामध्ये जवळपास केवळ 78 कॅलरीज असतात आणि पोटॅशियम असतात यामुळे वजन वाढण्यास मदत होते. दररोज आहारामध्ये बटाटा खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते.
अनेक लोकांना दही भात खायला आवडतो. दही भात खाण्यासाठी जेवढा चवदार आहे तेवढाच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण दही भात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासाठी मदत होते. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे दही भात खाल्ल्याने आपले वजन देखील वाढते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these tips for weight gain)