डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? मग ‘या’ टिप्स फाॅलो करा
आपले सुंदर डोळे हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमी झोप घेतली किंवा ताणताणाव यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली तर तुमचे सौंदर्य रंगहीन दिसू लागते.
मुंबई : आपले सुंदर डोळे हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमी झोप घेतली किंवा ताणताणाव यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली तर तुमचे सौंदर्य रंगहीन दिसू लागते. आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. यामुळे आपण आजारी असल्यासे सारखे दिसू लागतो. आपण देखील या समस्येने ग्रस्त आहात, तर या घरगुती उपायांचा नक्की अवलंब करू शकता. (Follow these tips to get rid of dark circles under the eyes)
-डोळे निरोगी राहण्यासाठी आणि काळी वर्तुळे जाण्यासाठी आपण आय क्रीम लावली पाहिजे. आय क्रीम लावून डोळ्यांना मॉइश्चरायझेशन केले पाहिजे. आय क्रीम लावणे केवळ डोळ्यांसाठीच नव्हे तर आपल्या त्वचेच्या काळजीसाठीही फायदेशीर आहे. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा जितकी जास्त मॉइस्चराइझर होईल तितकीच तुमची डोळे अधिक चांगली होतील.
-घरगुती उपचार काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी सर्वात प्रभावी असल्याचे सिद्ध होऊ शकते. काळी वर्तुळे अर्थात डार्क सर्कलपासून मुक्त होण्यासाठी डोळ्यावर काकडीचे काप ठेवा. काकडीत अँटीऑक्सिडेंट असतात. त्याचा थंड प्रभाव आपल्याला डोळ्यांना शीतलता देईल, तसेच डोळे डार्क सर्कलपासून मुक्त होतील.
-ज्या वस्तू थंड आहेत, त्या डार्क सर्कल कमी करण्यात लाभदायी ठरतात. आपण ही युक्ती थंड चमच्याच्या सहाय्याने देखील करू शकता. परंतु, आपण वापरलेल्या टी बॅग गोठवून ही टीप करून पाहू शकता. या टी बॅग आयमास्क प्रमाणे 15 मिनिटे डोळ्यांवर ठेवू शकता
-‘व्हिटामिन ई’ मुरुमे आणि काळी वर्तुळे कमी करण्यात मदत करते. तसेच यामुळे आपला त्वचेचा टोन चांगला राहतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी व्हिटामिन ईच्या तेलात कोरफड जेल मिसळावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल आपण डोळ्यांभोवती लावू शकता.
संबंधित बातम्या :
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Follow these tips to get rid of dark circles under the eyes)