Weight loss : मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा !
वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, वाढलेले वजन कमी करणे सोप्पे काम नाही पण अशक्य असे पण नाही.
मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, वाढलेले वजन कमी करणे सोप्पे काम नाही पण अशक्य असे पण नाही. वजन कमी करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आहार आणि दुसरे म्हणजे व्यायाम या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. (Follow these tips to reduce thigh fat)
आपल्या शरीरावर सर्वात जास्त चरबी पोट आणि मांडी तयार होते. पोटाच्या चरबीप्रमाणे मांडीवरची चरबी कमी करणे देखील सोपे नाही. मात्र, निरोगी आहार आणि नियमित व्यायामासह आपण मांडीवरची चरबी कमी करू शकतो. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुमची मांडीवरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
स्क्वॅट्स आणि लेझन्स जर आपल्याला फक्त आपल्या मांडीची चरबी कमी करायची असेल तर आपण लेझन्स आणि स्क्वाट्सचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. स्क्वॅट्स करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. स्क्वॅट्स दररोज 15 ते 30 मिनिटे मांडीला टोन्ड बनवू शकतात. या व्यतिरिक्त आपण एरोबिक आणि सायकलिंग आणि कार्डिओ व्यायाम देखील करू शकता. हे व्यायाम केल्यास मांडीची चरबी कमी होईल.
मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवा जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने शरीरावर सूज येऊ शकते. याशिवाय मीठामुळे तुमचे वजनही वाढू शकते. म्हणून, आपल्या आहारात मीठाचे सेवन कमी करा आणि आपल्या आहारात इलेक्ट्रोलाइट्सचा समावेश करा. इलेक्ट्रोलाइट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मिश्रित प्रमाणात असतात. एक महिना आहारात मीठाचे सेवन कमी करा बघा तुम्हाला फरक लगेचच जाणवेल.
जास्त पाणी प्या जेंव्हा आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते. त्यावेळी आपण पाणी पिले पाहिजे. आपण दिवसभरामध्ये जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. अन्नाच्या ओव्हरराईटिंगमुळे मांडीची चरबी वाढते. हे टाळण्यासाठी, खाण्यापूर्वी भरपूर पाणी प्या. पाणी आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आणि चांगले आहे. शरीरात भरपूर प्रमाणात पाणी असेल तर अनेक आजारही आपल्यापासून दूर राहतील.
पुरेशी झोप घ्या चांगली आणि पुरेशी झोप शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. आजकाल आपण दिनक्रमात आपण इतके व्यस्त होत चाललो आहोत की स्वतःला शांतीचे दोन क्षणसुद्धा आपण देऊ शकत नाही. मानवी शरीराला कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्याने थकवा जाणवणे तसेच एकाग्रता कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोप सर्वात महत्वाची आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Follow these tips to reduce thigh fat)