AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ‘हे’ साधेसोपे उपाय करा

हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे आता आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी 'हे' साधेसोपे उपाय करा
| Updated on: Mar 28, 2021 | 7:00 AM
Share

मुंबई : हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे आता आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. (Follow these tips to take care of your skin in summer)

-त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज घराबाहेर पडण्यापूर्वीच सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावी असे काही नाही वर्षभर जरी सनस्क्रीन वापरली तरी त्वचेसाठी चांगली असते.

-तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

-आंघोळीनंतर लगेच उन्हात जाऊ नये. भर उन्हात त्वचेचा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये.

-रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. उशिरा झोपणे तसंच आम्लपदार्थ खाऊ नयेत. -आहारात अ, क, ई, ड, ब जीवनसत्त्व असलेले पदार्थ असावेत. चहाचे व्यसन असणाऱ्यांनी ग्रीन टी अथवा तुळशीचा रस घ्यावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Follow these tips to take care of your skin in summer)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.