Foods for Hair : मजबूत केसांसाठी आहारात “या” पदार्थांचा करा समावेश, केसांच्या समस्या होतील दूर!!

Foods for Hair : केसांना मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी पोषक आहार गरजेचा आहे. सकस आहारा मुळे आपल्या केसांना सर्व आवश्यक पोषक तत्व प्राप्त होत असतात.

Foods for Hair : मजबूत केसांसाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश, केसांच्या समस्या होतील दूर!!
foods HairImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 9:20 PM

मुंबईः आपले केस मजबूत आणि चमकदार व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. केसांची वाढ व केस चमकदार बनवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर देखील करत असतात परंतु हे रासायनिक युक्त पदार्थ वापरल्याने आपले केस मजबूत बनण्या ऐवजी केसांचे आरोग्य व खराब होऊन जाते. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहे.काही घरगुती उपाय करून सुद्धा आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. या घरगुती उपायांमध्ये आपण घरच्या घरी केसांसाठी (Foods for Hair) तेल , हेअर मास्क आणि कंडिशनर इत्यादी उपाय करू शकतो. आपल्या केसांचे आरोग्य व केस मुळापासून मजबूत बनवण्यासाठी आपला आहार(Healthy Hair Tips) सुद्धा तितकाच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपल्या आहारामध्ये जर काही पोषक तत्व असतील तर यामुळे केसांना देखील पोषक तत्व मिळतात. आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांना मजबूत बनवण्यासाठी वेगवेगळे मिनरल्स आणि विटामिन (Hair Care) यांची आवश्यकता असते. निरोगी केसांसाठी सकस आहार सेवन करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अश्या काही पदार्थांबद्दल ज्यांचा समावेश आपल्याला आहारामध्ये करायला हवा.

अंडे

अंडी मध्ये भरपूर मात्रा मध्ये प्रोटीन उपलब्ध असते. अंडी मध्ये बायोटिन नावाचे घटक सुद्धा उपलब्ध असते. हे घटक आपल्या केसांसाठी एक महत्त्वपूर्ण पोषक तत्व मानले जाते. जर आपल्याला केसांचे आरोग्य चांगले व आपले केस मजबूत बनवायचे असतील तर आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश नेहमी करायला हवा.

हिरव्या पालेभाज्या

पालक मध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन उपलब्ध असतात. आपले केस मजबूत बनवण्यासाठी आयरन महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आहारामध्ये जर आपण नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश केला तर आपल्या केसांची मुळे मजबूत बनतात. जर आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर अशावेळी केस गळतीचे प्रमाण वाढते. जर आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण झाल्यास ऑक्सिजन आणि पोषकतत्व यामुळे केसांच्या मुळांना आणि केसांच्या पेशींना योग्य ती पोषक तत्व प्राप्त होत नाही. या सर्व परिस्थितीमुळे केसांची वाढ देखील थांबते,परिणामी आपले केस दिवसेंदिवस कमजोर बनतात.

आंबट फळे

आंबट फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये नेहमी करायला हवा, जसे की लिंबू ,संत्री यामध्ये विटामिन सी ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते. आपल्या शरीरातील लोहाचे शोषण करण्यासाठी विटामिन सी ची आवश्यकता असते. आपल्या आहारामध्ये विटामिन सी युक्त फळांचा समावेश जास्तीत जास्त करायला हवा, त्याचबरोबर नेहमी लिंबू पासून बनवले गेलेल्या पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करायला पाहिजे.कोलेजनच्या निर्मितीसाठी विटामिन सी ची आवश्यकता असते.

आक्रोड आणि सुकामेवा

ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आपल्या केसांना पोषकतत्व प्रदान करते. आक्रोड आणि सुकामेवा मध्ये ओमेगा फॅटी ऍसिड यांचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच आपले केस दाट व मजबूत बनण्यासाठी मदत होते. आपले शरीर निरोगी फॅटची निर्मिती लवकर करत नाही, अशातच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आपल्याला भरपूर प्रमाणात सेवन करायला पाहिजे.केस मजबूत बनण्यासाठी नेहमी आपल्या नाश्त्यामध्ये सुकामेवाचा समावेश अवश्य करायला हवा.

संबंधित बातम्या

Healthy Foods : या पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यही सुधारते, जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ

Weight Loss Tips : तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा, आणि फायदे पाहा…

केवळ 30 दिवसांत 10 किलो वजन कमी करा… या टिप्स ठरतील प्रभावी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.