Weight gain tips: वजन वाढवायचे असल्यास अश्या प्रकारे  ओट्सचा करा आहारात समावेश, काही दिवसात दिसून येईल फरक! 

ओट्स जर आपण योग्य पद्धतीने खाल्ल्यास आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीरावर खूप सारे फायदे दिसून येतात. जर तुमचे शरीर खूपच बारीक , सडपातळ आहे. काही पदार्थ खाल्ले तरी तुमच्या शरीराची वाढ होत नसेल, वजन वाढत नसेल तर ओट्स वजन वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

Weight gain tips: वजन वाढवायचे असल्यास अश्या प्रकारे  ओट्सचा करा आहारात समावेश, काही दिवसात दिसून येईल फरक! 
Weight gainImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 6:45 PM
मुंबईः अति लठ्ठपणा एक आजार आहे. या आजाराचा सामना(Health problems) करणारे लोक खूपच बिकट जीवन जगतात. या लोकांना अनेक संकटांना भविष्यात सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी जसे आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागतात त्याचबरोबर वजन वाढवणे देखील सोपे नसते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की ज्यांचे वजन वाढत नाही. शरीरयष्टी बारीक असल्याने अनेकदा या लोकांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्या लोकांना चारचौघांमध्ये मस्करीचा विषय बनविला जातो. जर वजन वाढत नसेल तर अशावेळी तुम्ही खूप सारे उपाय केले जातात परंतु त्या उपायांचा तुमच्या शरीरावर फारसा परिणाम होत नसेल तर अशावेळी अजिबात चिंता करू नका. ज्या व्यक्तींची शरीरयष्टी अतिशय बारीक,सडपातळ (Weigh gain tips)   असते अशा व्यक्तींना कुपोषित म्हणून देखील चिडवले जातात ,अशा वेळी आपल्याला आपल्या आहारावर(Diet)  विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व उपलब्ध असतात अशा प्रकारचे पोषक तत्व आपल्या आहारामध्ये अवश्य समाविष्ट करायला पाहिजे.
ओट्स मध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व उपलब्ध असतात. ओट्स च्या मदतीनेतुम्ही तुमच्या शरीराचे वजन सहजरीत्या वाढवू शकता. जर आपण ओट्स योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास ओट्स चे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात. योग्य पद्धतीने आपण पोच नियमितपणे खाल्ल्यास सडपातळ असलेले शरीर काही दिवसातच सदृढ बनेल.

डाळ आणि ओट्स

नैसर्गिक रित्या जर आपल्याला वजन वाढवायचे असेल तर ओट्स एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय मानला जातो. तज्ञ मंडळींच्या मते,जर आपण ओट्स आणि डाळ यांची खिचडी बनवून खाल्ल्यास आपल्या शरीराला खूप सारे फायदे प्राप्त होतात. या दोन्ही पदार्थांच्या मदतीने आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता नाहीशी होते सोबतच आपल्या शरीराला लोह आणि विटामिन देखील मिळतात. जर तुम्ही मूग डाळ आणि ओट्स यांची खिचडी बनवून खाल्ली तर तुमच्या शरीराला फायदा होईल.

ओट्स आणि  दूध

तुमचे सडपातळ शरीर सुदृढ बनवण्यासाठी ओट्स आणि दुध सेवन करणे अतिशय उत्तम मानले जाते. ओट्स काही वेळ आपण तुपामध्ये छान पद्धतीने परतून जर दुधामध्ये टाकून सेवन केल्यास आपल्या शरीराला खूप सारे पोषक तत्व प्राप्त होतात व चवीसाठी व आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये साखर आणि काजू, बदाम, पिस्ता याचा देखील वापर करू शकतात.

वेजिटेबल ओट्स

शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी भाज्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्याचबरोबर तुम्ही ओट्स काही भाज्यांसोबत देखील खाऊ शकता. ओट्स भाजी सोबत खाण्यासाठी तुम्ही काही वेळ ओट्स  तुपामध्ये परतून त्यानंतर कांदा, टमाटर ,पालक, यासारख्या भाज्यांचा वापर करून देखील आहारामध्ये समावेश करू शकतात. असे केल्याने तुमच्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये फॅट मिळेल आणि त्याचबरोबर शरीरातील आणि पोषक तत्व
जर शरीरात कमी असतील तर ते पोषक्त तत्व देखील वाढतील.

ओट्स  हलवा

आपल्यापैकी अनेक जण दुधी हलवा, गाजरचा हलवा खात असतात परंतु ओट्स हलवा देखील चवीला स्वादिष्ट असतो. हा ओट्स हलवा खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्यास मदत होते  म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी घरी बनवलेला ओट्स हलवा अवश्य खायला हवा. हा हलवा बनवण्यासाठी आपल्याला काही वेळ ओट्स तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडेसे पाणी मिक्स करायचे आहे.आवश्यकतेनुसार तुम्ही साखर देखील मिक्स करू शकता. जर तुम्हाला हवे असल्यास यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके टाकण्यास विसरू नका.अशा प्रकारे एक अतिशय स्वादिष्ट आणि दिसायला सुंदर पोषक तत्वांनी उपयुक्त ओट्स हलवा तयार होऊन जाईल.

संबंधित बातम्या

Summer drink: कडक उन्हापासून वाचण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा, शुगर वाढण्याचीही भीती नाही!

Health Care : जेवण केल्यानंतर पोट दुखते? मग हे घरगुती उपाय उपयोगी नक्कीच पडतील!

पांढरे केस चुकूनही तोडू नका त्याऐवजी ‘या’ उपायांचा अवलंब करा…

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.