Desi Ghee Benefits : केवळ आरोग्यच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही वरदान आहे तूप

तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तूपात व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूप खाल्लांने आपले केस आणि त्वचा चांगली होते.

Desi Ghee Benefits : केवळ आरोग्यच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही वरदान आहे तूप
तूप
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 7:04 AM

मुंबई : तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तूपात व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूप खाल्लांने आपले केस आणि त्वचा चांगली होते. केस बहुधा कोरडे आणि निर्जीव होतात. तुपामुळे डोक्यातील कोंडा, फुटलेले केस, पांढरे केस या समस्या दूर होऊ शकतात. जर आपले केस खराब झाले असतील तर आपण केसांना तूपाने मालिश करा. यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार बनतील. (Ghee beneficial for skin and hair)

1. जर आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल झाले असतील तर झोपण्याच्या अगोदर चेहरा पाण्याने धुवा. त्यानंतर डोळ्याखाली तूप लावा. काही दिवसातच फरक दिसून येईल.

2. वाढत्या वयानुसार, त्वचा सैल होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या दूर करण्यासाठी तुपाचे काही थेंब आपल्या हातावर घ्या आणि ते चेहरा आणि सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावा. सुमारे अर्धा तास तसेच ठेवा. यानंतर थंड पाण्याने तोंड धुवा.

3. जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्ही तुपात थोडे पाणी मिक्स करा आणि त्वचेवर लावा. साधारण 15 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.

4. आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाचे डाग दूर करण्यासाठी एक चमचे कडुनिंब पावडर, अर्धा चमचा हळद पावडर ​​आणि एक चमचे तूप याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी चेहरा धुवा.

5. ब्लॅकहेड्सची समस्या असल्यास मुलतानी मातीमध्ये तूप मिसळा आणि पॅक बनवून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

6. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची वाढ होत नसेल तर तूपात आवळा आणि कांद्याचा रस मिसळा आणि मालिश करा.

7. तूप केसांना हायड्रेट करते. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस निस्तेज व खराब होतात. अशा केसांसाठी तूप उत्तम उपाय आहे. त्यात आढळणारे हेल्दी फॅटी अॅसिड स्कल्पचे पोषण करून केसांच्या मुळांना हायड्रेट करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

(Ghee beneficial for skin and hair)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.