विवाहीत स्त्री पुरुषांच्या प्रेमात पडण्याआधी या गोष्टी जाणून घ्या

कोणीतरी बरोबर म्हटले आहे की प्रेम कधीही विचारपूर्वक केले जात नाही, ते फक्त घडते.

विवाहीत स्त्री पुरुषांच्या प्रेमात पडण्याआधी या गोष्टी जाणून घ्या
love affairImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 4:40 PM

कोणीतरी बरोबर म्हटले आहे की प्रेम कधीही विचारपूर्वक केले जात नाही, ते फक्त घडते. पण जेव्हा हे प्रेम एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषासोबत होतं, तेव्हा तुम्ही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण विवाहित लोकांशी असलेले संबंध तुम्हाला एका काळानंतर अडचणीत आणू शकतात. त्यांच्यासाठी प्रेमात पडणे हे त्यांच्या मनोरंजनाचे केवळ एक साधन आहे. कारण तो तुमच्यासाठी कधीही आपल्या कुटुंबाशी तडजोड करणार नाही.

त्यामुळे विवाहित व्यक्तींशी संबंध ठेवणे हे प्रत्येक अर्थाने चुकीचे आहे, असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला अशा लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये येणं का योग्य नाही हे समजण्यास मदत करतील.

विवाहित लोकांना डेट करणे म्हणजे तुमचे हृदय कधीही तुटू शकते. कारण विवाहित लोक सहज प्रेमात पडतात. पण त्यांचं कुटुंब सोडायची वेळ आली की तो अशा नात्यातून बाहेर पडणं पसंत करतात.

आपलं कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे एकदा लक्षात आलं की, नात्यापासून वेगळं होण्यापूर्वी ते एक मिनिटही विचार करत नाही.

सुरुवातीला तुम्हाला त्यांच्याशी असलेलं तुमचं नातं रोमांचकारी वाटू शकतं. त्याची कंपनी तुम्हाला खूप आनंदही देऊ शकते, पण काही काळानंतर जेव्हा तुम्हाला हे कळते की, ते तुमच्यासाठी कधीही आपल्या कुटुंबापासून विभक्त होणार नाही, तेव्हा तुम्हाला फसवल्यासारखं वाटतं.

विवाहित लोकांशी असलेले संबंध सामान्य नात्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. कारण तुम्ही दोघेही एकमेकांना शारीरिकदृष्ट्या बरे वाटू शकता. परंतु जेव्हा इतर जोडप्यांप्रमाणे डेट नाईट्सवर जाण्याची वेळ येते, तेव्हा मात्र दोघेही सार्वजनिक ठिकाणी कधीही एकत्र राहू शकत नाही.

इतकंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही दोघंही एकमेकांचा हात धरू शकत नाही. तुम्ही दोघेही आपले रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू शकत नाही. काही काळ हे सगळं ठीक वाटतं, पण आजूबाजूला इतर जोडपी पाहिली की हे नातं तोडण्याचे विचार मनात येऊ लागतात.

जेव्हा तुम्ही विवाहित पुरुषाशी संबंध ठेवता तेव्हा तुमच्या कामावर खूप परिणाम होतो. कारण तुम्ही जोडीदारासोबत ज्या ठिकाणी गेलात तिथे तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकत नाही. तुम्हाला तुमचा फोन नंबरही बदलावा लागू शकतो.

इतकंच नाही तर एकमेकांना भेटायचं असेल, तर जोडीदाराशी खूप खोटं बोलायचं असतंच, शिवाय आधीच तुमच्या कार्यक्रमांचं नियोजनही करावं लागतं. हे देखील एक कारण आहे की अशा संबंधांमुळे आपण एका वेळेनंतर चिडचिडे होतो.

विवाहित लोकांशी संबंध ठेवण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ते कदाचित आपल्याला नेहमीच उपलब्ध नसतील. दिवसभर तुमच्याबरोबर कितीही मस्ती केली तरी त्यांना पुन्हा आपल्या घरी जावंच लागणार.

त्याचबरोबर जेव्हा ते आपल्या कुटुंबासोबत असतो तेव्हा तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तो तुमच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.