Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात ‘या’ 3 पिठाच्या चपात्या बेस्ट, गव्हाच्या पोळीचा पडेल विसर

तुम्हाला उन्हाळ्यात तंदुरुस्त राहायचे असेल आणि काही हलके खायचे असेल तर तुमच्या आहारात गव्हाच्या चपातीऐवजी इतर पिठापासून बनवलेल्या चपात्यांचा समावेश करा. या चपात्या खाण्यास खूप हलक्या आहेत आणि तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी हेल्दी आहेत.

उन्हाळ्यात 'या' 3 पिठाच्या चपात्या बेस्ट, गव्हाच्या पोळीचा पडेल विसर
Health benefits of eating ragi and chana roti in summer season apart from whole wheat rotiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2025 | 5:46 PM

उन्हाळ्यात आपल्याला अनेकदा असे पदार्थ खाण्याची इच्छा होते जे शरीराला थंडावा देतात. मात्र या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात वारंवार बाहेरचे किंवा जंक फूड खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. म्हणून, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी घरात तयार केले अन्नपदार्थांचे सेवन करावे. त्यातच तुमच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करा जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

आपण पाहतोच की, सहसा प्रत्येक घरांमध्ये गव्हाच्या पोळ्या बनवल्या जातात. मात्र तुम्हाला उन्हाळ्यात स्वतःला हेल्दी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर गव्हाच्या पीठाऐवजी इतर पिठापासून बनवलेल्या पोळ्यांचा तुमच्या आहारात समावेश करून पाहा. कारण ह्या पोळ्या फक्त खायला चविष्ट नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. अशाच काही पीठांबद्दल आणि त्यांच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. तसेच तुम्ही या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या एकदा खाल्ल्या की गव्हाच्या पोळीचा तुम्हाला विसर पडेल.

या पीठांपासून बनवलेल्या पोळ्या उन्हाळ्यात शरीरासाठी सर्वोत्तम

चन्याचे पीठ (बेसन): चन्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, म्हणून चन्याच्या पीठांपासून बनवलेली भाकरी खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात, व शरीराला शक्ती प्रदान करते. त्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. उन्हाळ्यात या भाकरीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाची जळजळही कमी होते.

नाचणीचे पीठ : नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाचणी पासून बनवलेल्या भाकरीचे सेवन तुम्हाला खुप फायद्याचे ठरेल. कारण याने शरीराला थंडावा मिळतो आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया निरोगी ठेवते आणि साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करते.

जवसाचे पीठ : उन्हाळ्यात तुम्ही गव्हाच्या पोळी ऐवजी जवसाच्या पीठापासून तयार केलेली भाकरीचे सेवन करावे. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि जवसमध्ये थंडावा असल्याने उन्हाळ्यात ते फायदेशीर मानले जाते.

हरभरा, नाचणी आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यांच्या सेवनाने तुमचे पोट तर भरतेच, शिवाय तुमचे आरोग्यही चांगले राहते मात्र तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल किंवा तुम्ही कोणत्याही आजारावर उपचार घेत असाल, तर कोणताही नवीन आहार घेताना सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....