झोपेतून जागे होताच मोबाईल वापरण्याची सवय? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!

हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण मोबाईल वापरत आहेत. हल्ली मोबाईलचा वापर देखील वाढला आहे म्हणूनच सकाळी डोळे उघडताच आपल्या पैकी अनेकजण मोबाईलचा वापर करतात परंतु याचे विपरीत परिणाम सुद्धा भविष्यात उद्भवू शकतील.

झोपेतून जागे होताच मोबाईल वापरण्याची सवय? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 7:27 AM

मुंबई : सध्याच्या दिवसांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून आपण सगळे घरी असल्याने सगळी कामं कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईल या तंत्राच्या आधारे करत आहोत. या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात व कोरोना महामारीच्या (corona situation) काळामध्ये प्रत्येकजण मोबाईलचा (mobile) वापर करत आहे.आता थोडीफार परिस्थिती सुधारली असली तरी तंत्रज्ञानाचा वापर मात्र कमी झाला नाहीये. अनेकदा 24 तास मोबाईल वापरणाऱ्या मंडळींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे परंतु या मोबाईलचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. मोबाईल,स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस एवढा वाढलेला आहे की जर आपल्याकडे काही वेळ स्मार्टफोन नसला तरी आपल्याला चुकल्यासारखे वाटते. हल्ली स्मार्टफोनचा (smartphone use) वापर एक सवय नाही तर व्यसन बनले आहे. अनेकजण असे सुद्धा आहेत की, जे रात्री झोपताना आपल्याजवळ स्मार्टफोन घेऊन झोपतात आणि सकाळी उठल्यावर झोपेतून पहिल्यांदा मोबाईल चेक करतात, अशा लोकांची सुद्धा संख्या कमी नाहीये. तसे पाहायला गेले तर स्मार्ट फोन व मोबाईल वर जास्त प्रमाणात अवलंबून राहणे हे आपल्यासाठी चांगले नाही. जर तुम्हाला सुद्धा सकाळी झोपेतून जागे झाल्यावर मोबाईल वापरण्याची सवय असेल तर ही सवय भविष्यात घातक ठरू शकते. या सवयीमुळे तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे ,असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

ताण तणाव आणि चिंता

अनेक जण सकाळी झोपेतून जागे झाल्यावर सर्वात आधी मोबाईल चेक करत असतात, अशी अनेकांना सवय असते.सकाळी उठल्यावर मोबाईल जर आपण हातामध्ये घेतला तर त्यातील मेसेज, ईमेल, रिमाइंडर, इंस्टाग्राम पोस्ट इत्यादी सगळ्यांच्या नोटीफिकेशन आपल्याला स्क्रीनवर दिसतात, जे चिंता आणि तणावाचे कारण ठरू शकते. झोपेतून जागे झाल्यावर जर आपण सोशल मीडिया चेक करतो तेव्हा आपला मेंदू सोशल मीडियावरील वेगवेगळ्या माहितीमुळे व्यस्त होऊन जातो. अशातच आपल्या दिवसाची सुरुवात तनाव आणि चिंता ग्रस्त दर्शविणाऱ्या बातम्या किंवा घटना द्वारे होते. अशा प्रकारची चिंता व ताणतणाव आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

कॅन्सर आणि दृष्टी खराब होण्याची शक्यता

एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की, आपण सकाळी झोपेतून जागे झाल्यावर मोबाईलचा वापर केल्यास आपल्या डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. मोबाईल मधील लाईट थेट डोळ्यांवर आल्यामुळे तुम्हाला डोळ्यांच्या किंवा डोकेदुखीच्या समस्या भविष्यात उद्भवू शकतील. यामुळे तुमची एकाग्रता व लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते सोबतच जर आपण स्मार्ट फोन जास्त वेळ वापर केला तर आपल्याला मान दुखी, वेदना, अति लठ्ठपणाची समस्या, कॅन्सर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, अनिद्रा आणि मेंदू मध्ये होणारे वेगवेगळे बदल यासारख्या समस्या भविष्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

चिडचिडेपणा वाढू शकतो

सकाळी झोपेतून जागे झाल्यावर जर आपण मोबाईल वापरला तर अशावेळी चिडचिडपणा येऊ शकतो. सकाळी उठल्यावर तुम्ही मोबाईल मध्ये अशी एखादी घटना किंवा गोष्ट पाहिली ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने होईल, अशा प्रकारचे दृष्य व घटना पाहिल्यामुळे तुमचा दिवस सुद्धा संपूर्ण नकारात्मक जाण्याची शक्यता असते. नकारात्मक दृष्टिकोन मुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता जास्त असते. या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम तुमच्या मेंदूवर होत असतो परिणामी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. ज्या व्यक्तीला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस खराब जातो. हाती घेतलेले काम सुद्धा व्यवस्थित होत नाही, त्या कामांमध्ये वेगवेगळे प्रकारचे अडथळे निर्माण होऊ लागतात.

डिप्रेशन येण्याची भीती

रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर मोबाइल वापरणाऱ्यांना भविष्यात डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते ,असे संशोधन केल्यावर सिद्ध झाले आहे. नियमितपणे आपण दिवसभरातून जास्त वेळ मोबाईल वापरला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होतो ,अशावेळी जर कमी मोबाइल वापरला तर अनेकदा युजरला ताणतणाव सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकजण सकाळी उठल्यावर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप स्टेटस यासारख्या सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर करत असतात . सकाळी उठल्यावर या सगळ्या गोष्टी पाहिल्याने आपण आपली तुलना इतरांसोबत करतो आणि परिणामी कुठे तरी आपण स्वतःला कमी लेखतो यामुळे सुद्धा तुम्हाला ताणतणाव सारखी परिस्थिती तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…

मीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स

आयफोनसह या फोनमधून व्हाट्सअॅप होणार बंद

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....