भारताचे हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ तुम्ही पाहिलंत का? असा बनवा तेथे फिरण्याचा प्लॅन
तुम्ही अशा जागेच्या शोधात असाल जिथे पर्वतांचे सौंदर्य, हिरवळ आणि गर्दीपासून दूर शांत वातावरण असेल. आम्ही तुमच्यासाठी मनालीपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेले एक अद्भुत ठिकाण आहे ज्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात थोडीशी विश्रांती मिळावी यासाठी शांत ठिकाणी म्हणजेच डोंगराळ निसर्गाच्या सानिध्यात जायला अनेकांना आवडते. कारण असे बरेच लोकं आहेत ज्यांना प्रवासाची खूप आवड आहे आणि त्यांना जगातल प्रत्येक ठिकाणं एक्सप्लोर करायचे आहे. कारण आपल्या जगात असे अनेक सुंदर ठिकाणे आहेत, त्यापैकी स्वित्झर्लंड हे खुप लोकंप्रिय आहे. प्रत्येकाला हे सुंदर ठिकाण पहायचे असते. पण आता तुम्हाला स्वित्झर्लंड पाहण्यासाठी देशाबाहेर जावे लागणार नाही.
हो, आता तुम्हाला स्वित्झर्लंड हे आपल्या भारतातच पाहता येणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्याला भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. हे ठिकाण इतके सुंदर आहे की तुम्हाला येथून परत निघावेसे वाटणार नाही. विशेष म्हणजे हे ठिकाण मनालीपासून फक्त २ तासांच्या अंतरावर आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे मिनी स्वित्झर्लंड कुठे आहे आणि इथे कसे पोहोचायचे.




मिनी स्वित्झर्लंड कुठे आहे?
मिनी स्वित्झर्लंड हे ठिकाण म्हणजे बारोट व्हॅली, जे हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात आहे. हे ठिकाण मनालीपासून फक्त 2 तासांच्या अंतरावर आहे. हे ठिकाण अजून फारसे प्रसिद्ध नाही, त्यामुळे येथे गर्दी कमी आहे आणि तुम्हाला खऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी या ठिकाणी मिळते. मनालीपासून त्याचे अंतर फक्त 110किमी (2-3 तासांचा प्रवास) आहे, म्हणून जर तुम्ही मनालीला भेट देणार असाल तर तुमच्या प्लॅनमध्ये बारोट व्हॅलीचा नक्कीच समावेश करा.
View this post on Instagram
बारोट व्हॅलीची खासियत
आम्ही तुम्हाला सांगतो की बारोट गाव 1920च्या दशकात शानन जलविद्युत प्रकल्पासाठी बांधण्यात आले होते. पण आज ते एक पर्यटन स्थळ बनले आहे. स्वातंत्र्यापूर्वी, बारोट हा कुल्लू खोऱ्याला कांगडा खोऱ्याशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग होता. पूर्वी हा मार्ग खेचरांच्या वापरासाठी ओळखला जात होता. पण आता हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या, थंड वारे, देवदारचे घनदाट जंगल आणि ॲडवेंचर ॲक्टिव्हिटी साठी ओळखले जाते. बारोट व्हॅलीमध्ये देवदारचे उंच घनदाट जंगल, थंड वारे आणि बर्फाच्छादित पर्वत आहेत जे त्याला स्वर्ग बनवतात. मनाली आणि शिमला प्रमाणे इथे गर्दी कमी आहे. जर तुम्हाला एकटे काही शांत क्षण घालवायचे असतील तर बारोट व्हॅली तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बजेट फ्रेंडली देखील आहे.
बारोट व्हॅली म्हणजेच मिनी स्वित्झर्लंडमध्ये काय पहावे?
बारोट व्हॅलीमध्ये सुंदर धरणे आहेत. तुम्हाला धबधबे, सूर्यास्ताचे सुंदर दृश्य आणि नद्या पाहायला मिळतील. येथील उहल नदीत शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी मासेमारी करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील बारोट व्ह्यू पॉइंटवरून तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय पाहू शकता. नेहरा ट्रॅकवर जाऊन तुम्ही खूप ॲडवेंचर करू शकता. तसेच या ठिकाणी तुम्हाला हिमाचल गावांची संस्कृती आणि जीवनशैली जवळून पाहता येईल. जर तुम्ही इथे आलात तर घनदाट जंगलात ट्रेकिंग करायला विसरू नका. घनदाट जंगलातून ट्रेकिंग केल्याने तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल.
बारोट व्हॅलीला कसे पोहोचायचे?
बारोट व्हॅलीपर्यंत पोहोचणे देखील खूप सोपे आहे. तुम्हाला दिल्लीहून जोगिंदर नगरला थेट बसने जावे लागेल. जोगिंदर नगरला पोहोचल्यानंतर, 35 किमी पुढे असलेल्या या दरीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्थानिक बस किंवा टॅक्सी देखील मिळेल. येथे प्रवास करण्याचे बजेटही खूपच कमी आहे. तुम्ही फक्त 4-5 हजार रुपयांमध्ये हे सुंदर ठिकाण एक्सप्लोर करू शकता.