लांबसडक केसांसाठी घरच्या घरी तयार करा ‘हा’ हेअर मास्क !
मऊ, काळेभोर आणि लांबसडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र, ट्रीटमेंट घेऊन हजारो रूपये खर्च देखील असे केस मिळत नाहीत.
मुंबई : मऊ, काळेभोर आणि लांबसडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र, ट्रीटमेंट घेऊन हजारो रूपये खर्च देखील असे केस मिळत नाहीत. त्यामध्ये सध्या अनेक महिला या केस गळतीमुळे त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला प्रोटीन पॅक हेअर मास्क सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केस गळती कमी होईल आणि पार्लरमध्ये न जाता आपण घरच्या घरी चांगले केस मिळू शकतात. (Homemade protein pack hair mask for long hair)
अळशीची पूड दोन चमचे, नारळाचे तेल चार चमचे, फुल क्रीम मिल्क एक कप, अंड्यातील पिवळे बलक एक, दही तीन चमचे सर्वात अगोदर आपण अळशीच्या बियांपासून जेल तयार करून घ्या. यासाठी एका पॅनमध्ये अळशीच्या बियांची पावडर घ्या. त्यामध्ये दूध आणि एक वाटी पाणी ओता. गॅसच्या मध्यम आचेवर जवळपास 20 मिनिटे मिश्रण शिजू द्या सामग्री घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि एका वाटीमध्ये मिश्रण गाळून घ्या.
अळशीचे जेल तयार झालं आहे. हे जेल एका बाजूला ठेऊन द्या. अळशीच्या जेलसह अन्य सामग्री देखील मिक्स करा. हि सर्व पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि केसांना लावा. साधारण 30 ते 40 मिनिटे हे मिश्रण तसेच केसांवर ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धूवून टाका. आठवड्यातून दोन वेळा असे केल्याने आपले केस मऊ, काळेभोर आणि लांबसडक होतील. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे.
कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.
संबंधित बातम्या :
Narendra Modi | मोदींचा फिटनेस मंत्र तुम्हाला माहितीये का?https://t.co/A1wk5o4uS5 #NarendraModi #fitness
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2020
(Homemade protein pack hair mask for long hair)