Honey | मधाचा गोडवा भावतोय? अतिसेवनामुळे शरीरावर होतात घातक परिणाम..
मध हे शरीरासाठी लाभदायक समजले जाते. परंतु त्याचा अतिरेक केला, गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा मोठा दुष्परिणामही शरीरावर होत असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात मधाचा वापर केल्यास त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतात.
शरीराच्या अनेक समस्यांसाठी मध (Honey) हे अत्यंत गुणकारी ठरत असते. शरीराच्या आतील पोषणासाठीच नव्हे तर, केसांच्या समस्यांवरदेखील फार पूर्वीपासून मधाचा वापर केला जात असतो. मधाचे रोज प्रमाणामध्ये सेवन केल्यास त्याचे शरीराला अनेक चमत्कारी फायदेखील मिळत असतात. परंतु अनेकदा आपण मधाच्या गोडव्याला भूलतो. त्याचा अतिरेक करीत असतो. यामुळे त्याचे आपल्या शरीराला फायदे तर नाहीच परंतु नुकसान अधीक होत असते. त्यामुळे मधाचा आपल्या आहारात प्रमाणापेक्षा जास्त वापर व्हायला नको, याचा दुष्परिणाम (Disadvantages) म्हणून वजन वाढणे, लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब, दात खराब होणे अशा अनेक समस्या निर्माण होत असतात. मध हे आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. पण कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. जर तुम्ही जास्त प्रमाणात मधाचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्यापासून होणार्या दुष्परिणामांबद्दल माहिती असायला हवी, या लेखातून ती जाणून घेउ या.
लठ्ठपणाची समस्या
मधाचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास वजन वाढून आपणास लठ्ठपणाची समस्या जाणवू शकते. मधामध्ये साखरेपेक्षा गोडपणा कमी असला तरी त्याचे अतिसेवन केल्याने लठ्ठपणा व त्यातून अनेक व्याधी जडू शकतात.
मधुमेह
मध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु तज्ज्ञांच्या मते, जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर ते शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवू शकते. अशा स्थितीत दिवसभरात मध मर्यादित प्रमाणात खावे, त्याचा अतिरेक केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून आपल्याला मधुमेहदेखील होउ शकतो.
दातांवर वाईट परिणाम
मध हे आधीच गोड असते. त्यात त्याचे अतिरिक्त सेवन केल्याने त्याच्या गोडपणामुळे तोंडात बॅक्टेरियाची समस्या निर्माण होउ शकते. बॅक्टेरियाचा दातांवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे तोंडातून दुर्गंधी देखील येऊ शकते, दात किडतात.
पचनावर परिणाम
मधाचे जास्त सेवन केल्याने पचनसंस्थेवर त्याचा विपरित परिणाम होतो. यामुळे पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होतात. मधात गोडवा असल्याने ते जास्त प्रमाणात पोटात गेले तर जुलाब तसेच लहान मुलांच्या पोटात किरींग निर्माण होत असतात. त्यामुळे त्याचा अतिरेक टाळून ते प्रमाणात खावे.
उच्च रक्तदाब
ज्यांना आधीच मधुमेह व उच्च रक्तदाबाची समस्या असेल अशांनी मधापासून आधीच दूर रहावे, यातून त्यांच्या समस्यात अधीक भर पडू शकते. मधाच्या गोडवा जास्त असतो. मग त्यातून लठ्ठपणा, मधुमेह नंतर रक्तदाबाची समस्या वाढत असते. त्यामुळे मधाचे प्रमाणातच सेवन करणे फायद्याचे ठरते.
संबंधित बातम्या :
Skin Care : डी-टॅन पॅक घरी बनवायचा आहे का? मग ही खास पध्दती फाॅलो करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
अॅपल सायडर व्हिनेगरमुळे कोंड्याची समस्या झटपट दूर होईल! तुम्हाला माहीत आहे कसे?