Summer Drink : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी बेलाच्या फळाचा रस पिणे फायदेशीर, वाचा !
बेलाचे फळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात बेल फळ आहारात घेतले पाहिजे.
मुंबई : बेलाचे फळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात बेलाचे फळ आहारात घेतले पाहिजे. कारण हे फळ आपले शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. बेलाच्या फळामध्ये प्रथिने, लोह, जस्त, बीटा-कॅरोटीन, थायमिन, राइबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन-सी सारखे घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिला पाहिजे. (It is beneficial to drink bel fruit juice to stay healthy in summer)
1. बेलाच्या फळामध्ये व्हिटॅमिन-ए, लोह आणि जस्त असते. हे डोळे आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केस कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.
2. बेलाच्या फळामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. बेलाचे फळ रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करते.
3. पोटातील आजारांसाठी बेल खूप चांगला मानला जातो. हे पाचक प्रणाली सुधारते. बेलाचा सिरप पिल्याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याधांनी ग्रस्त लोकांना आराम मिळतो.
4. बेलामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे यकृत दाह कमी करण्यासाठी कार्य करतात. यकृतच्या रुग्णांसाठी याचा सिरप फायदेशीर ठरतो.
5. उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
बेलाचा रस तयार करण्याची पध्दत प्रथम बेलाचे फळ फोडून त्यामधील लगदा काढून घ्या. त्यामधील बिया देखील काढा. या बिया आपण तशाच ठेवल्यातर आपले शरबत कडू होऊ शकते. एका मोठ्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये बेलाचा लगदा टाका आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. यानंतर चाळणीच्या सहाय्याने हे गाळून घ्या. आता त्यामध्ये साखर मिक्स करा. यानंतर चिमूटभर मीठ घाला आणि बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करावे.
संबंधित बातम्या :
Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(It is beneficial to drink bel fruit juice to stay healthy in summer)