50 पैशांमध्ये समोसा, कचोरी अन् 10 रुपये किलो मिठाई
सध्या कचोरी, समोसा कमीत कमी 10 ते 15 रुपयांना मिळतो. चांगल्या दुकानांमध्ये हा दर 25 रुपयांपेक्षा कमी नाही, पण हे दर 50 पैसे असेल तर. असेच एक बिल आहे.
मुंबई : तो काळ काय होता, त्या काळात किती स्वस्ताई होती, असे आपण वृद्ध लोकांकडून नेहमी ऐकत असतो. त्याची आठवण करुन देणारे एक बिल सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर अनेक कॉमेंट पडल्या असून चर्चाही जोरात सुरु आहे. तुम्हाला सध्या कचोरी, समोसा कमीत कमी 10 ते 15 रुपयांना मिळतो. चांगल्या दुकानांमध्ये हा दर 25 रुपयांपेक्षा कमी नाही. मिठाई 450 ते 600 रुपये किलो मिळते. परंतु कचोरी, समोसा 50 पैसे अन् मिठाई 10 रुपये किलो, असे बिल पाहिले तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
केवळ 50 पैशांमध्ये
ही गोष्ट आहे सुमारे 40 वर्षांपूर्वींची. त्यावेळी एक समोसा केवळ 50 पैशांमध्ये मिळत होता. मिठाई 10 रुपये किलो दराने उपलब्ध होती. 1980 मधील मिठाईचे बिल सोशल मीडियावर (Low Prices of Sweets and Snacks)व्हायरल होत आहे. हे बिल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गेल्या 40 वर्षांत महागाई प्रचंड वाढली आहे.
1980 च्या दशकात मिठाई खाणे अन् नास्ता करणे खूप स्वस्त होते. 2023 मध्ये समोसाची किंमत आज 10-25 रुपयांवर गेली आहे यावर लोकांचा विश्वास बसत नाही. पूर्वी ते 50 पैशांना मिळत होते. फेसबुकवर शेअर केलेल्या मेन्यू कार्डमधील मिठाईचे दर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हायरल मेनू कार्डमध्ये समोसा, कचोरीचे दर फक्त 50 पैसे आहे. इतकेच नाही तर लाडू, रसगुल्ला, काळा जमान, रसमलाई यासारख्या मिठाई 10 ते 15 रुपये किलोने मिळत होत्या.
सर्व मिठाई 20 रुपयांच्या आत
या कार्डमध्ये जवळपास सर्व मिठाई 20 रुपयांच्या आत उपलब्ध आहे. समोसे आणि कचोरी 1 रुपयात 2 येत आहेत. म्हणजे 1 रुपयात नाश्ता पूर्ण करता येतो. काळा जामुन – 14 रुपये किलो. आज एका रसमलाईची किंमत 40 रुपये आहे, जी पूर्वी 1 रुपयाला मिळत होती.
हे बिल सोशल मीडियावर पाहिल्यानंतर जुन्या लोकांना त्यांचा काळ आठवत आहे. एका युजरने कॉमेंटमध्ये म्हटले आहे, 1980 मध्ये त्याचा पगार रु. 1000 होता. आज १ लाख म्हणजे रुपये आहे. दुसर्या यूजरने लिहिले आहे – सोशल मीडियावर हा मेनू पाहून मी खूप भावूक झालो आहे. काळ कसा बदलला आहे असे वाटते.