Curry Leaves Benefits : कढीपत्ता त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर!
कढीपत्ता विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये चव आणि सुगंधासाठी वापरला जातो. अनेक वर्षांपासून कढीपत्त्याचा वापर भारतीय खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कढीपत्त्याचा वापर केस आणि त्वचेच्या काळजीसाठी देखील केला जातो.
मुंबई : कढीपत्ता विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये चव आणि सुगंधासाठी वापरला जातो. अनेक वर्षांपासून कढीपत्त्याचा वापर भारतीय खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कढीपत्त्याचा वापर केस आणि त्वचेच्या काळजीसाठी देखील केला जातो. केसांसाठी आणि त्वचेसाठी आपण कढीपत्त्याचा वापर करू शकतो. (Curry Leaves are beneficial for hair and skin)
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर
केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. डोक्यातील कोंडाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा वापर देखील करू शकता. डोक्यातील कोंड्यापासून मुक्त होण्यासाठी कढीपत्ता थोड्याशा दुधात बारीक करून पेस्ट बनवा. ते टाळूवर लावा आणि 15-20 मिनिटांनी धुवा. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी कढीपत्याचा वापर करा.
कढीपत्त्याचे तेल
कढीपत्ता आपल्या खराब झालेल्या केसांसाठी एक नैसर्गिक उपाय आहे. हे तुमचे केस गळती कमी होण्यास मदत करते. हे केसांचीमुळे मजबूत करण्यास मदत करते. केसांचे नुकसान टाळण्यासाठी, थोडे नारळ किंवा मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात कोरडा आणि स्वच्छ कढीपत्ता घाला. पाने लवकरच त्यांचा रंग बदलतील. आता हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केस गळती रोखता येते.
कढीपत्ता आणि दही हे दोन्ही आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. आपण जर दही आणि कढीपत्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी कढीपत्ताची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
मुरूमाची समस्या
मुरुमामुळे अनेकदा चेहऱ्यावर डाग पडतात. अनेक उपाय करूनही हे चेहऱ्यावरील डाग दूर होत नाही. कढीपत्ता चेहऱ्यावरील मुरूमाचे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी कढीपत्ता धुवून बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घाला आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. दर आठ दिवसातून दोनदा हा पॅक आपल्या चेहऱ्यावर लावला पाहिजे.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Curry Leaves are beneficial for hair and skin)