वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पाच खास पेय प्या, झटपट वजन कमी होईल !

वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.

वजन कमी करण्यासाठी 'हे' पाच खास पेय प्या, झटपट वजन कमी होईल !
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 7:39 AM

मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाली आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे व्यायाम करू देखील काही फायदा होत नाही. खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आजच आपल्या आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करा. (Drink these five drinks to loss weight)

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. जिरे केवळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनीच भरलेले नसून ते अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. दीर्घ काळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी जोडली गेली आहे आणि यामुळे स्वयंप्रतिकारक परिस्थिती देखील उद्भवू शकते. जिरे पाणी पाचन फायद्यासाठी देखील ओळखले जाते.

ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर, आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील. जर, आपण दिवसभर हे पाणी पिऊ शकत नसाल, तर किमान सकाळी रिक्त पोटी आणि जेवणानंतर नक्की प्या.

बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी असून त्यात कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक खनिज पदार्थांचा समावेश आहे. बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मग रात्री एका लिटर पाण्यात 1 चमचे बडीशेप घाला. सकाळी उठून हे पाणी प्या. आपण दररोज असे केल्यास, लवकरच वजन कमी होईल. बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते.

माचा टी हा चहाच्या हिरव्या कोरड्या पानांपासून बनवला जातो, म्हणून त्याचा रंगही हिरवा असतो. हा चहा तयार होण्यास बराच वेळ लागतो. हा चहा लठ्ठपणा कमी करण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. एका संशोधनात असेही समोर आले आहे की, जर 12 आठवड्यांपर्यंत सतत हा चहा सेवन केला, तर शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच कंबरेचे आकार आणि शरीराचे वजन देखील कमी होते. अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध ‘माचा चहा’ गंभीर आजारांपासून आपला बचाव करतो.

 संबंधित बातम्या : 

(Drink these five drinks to loss weight)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.