तुळशीची पाने खा आणि निरोगी राहा !

‘तुळशी’ ही हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते. त्याच वेळी, आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे.

तुळशीची पाने खा आणि निरोगी राहा !
तुळशीची पाने चघळणे आरोग्यास हानिकारक
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 8:50 AM

मुंबई : ‘तुळशी’ ही हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते. त्याच वेळी, आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्‍याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. ती केवळ एक वनस्पतीच नाही तर, रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी इम्युनिटी बूस्टर आणि अँटी-बायोटीक देखील तुळश आहे. दररोज रिकाम्या पोटीवर तुळसची पाच पाने खाण्याची सवय असेल, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल. (Eating basil leaves is beneficial for health)

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर तुळशीची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीची पाने खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. विशेष म्हणजे तुळशीची पाने लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण खाऊ शकतात. आपण चहामध्ये देखील तुळशीचे पाने घालू शकतात. यामुळे चहा चवदार बनेल आणि त्याचे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदे होतील.

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणालीला अधिक बळकट बनवतात. याशिवाय तुळशीची पाने पाचन समस्या दूर करतात. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अ‍ॅडाप्टोजेन ताण कमी करण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो. तुळशीची पाने डोकेदुखीमध्ये देखील आराम देतात.

तुळस आपल्या शरीरास डिटोक्स करते आणि चयापचय दर वाढवते. तुळशीची पाने वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात. मुख दुर्गंधीचा त्रासही तुळशीच्या पानांनी नाहीसा होतो. जर तुम्ही दररोज सकाळी तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ली तर, ती तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकतात आणि तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!

(Eating basil leaves is beneficial for health)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.