Holi 2021 | भांगचा हँगओव्हर उतरवायचा?; मग हे कराच!
होळी म्हणजे रंगांचा उत्सव… विविध रंगांची उधळण मात्र, होळी म्हटंले की, भांग येतेच.
मुंबई : होळी म्हणजे रंगांचा उत्सव… विविध रंगांची उधळण मात्र, होळी म्हटंले की, भांग येतेच. लोक विशेषत: या दिवशी भांगचे सेवन करतात. परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात भांगचे सेवन केले तर ते तुमच्या शरीरासाठी घातक आहे आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. यावर्षी 29 मार्च रोजी होळी साजरी करण्यात येणार असून लोक दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील भांगचे सेवन करतील मात्र, भांगचे जास्त प्रमाणात सेवन केले आणि त्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची भांगची नशा कमी होईल. (Follow these tips to get rid of hangovers after consuming cannabis for Holi)
-लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि हे हँगओव्हर बरे करण्यात मदत करेल. व्हिटॅमिन सीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने हे भांगचे हँगओव्हरच्या परिणामाचा प्रतिकार करेल. लिंबू पाणी पिणे आपल्याला दिवसभर हायड्रेटेड आणि ताजे ठेवेल. मळमळ आणि थकवा कमी करण्यास देखील मदत करेल. त्यामुळे भांग पिल्यानंतर लिंबू पाणी पिणे आवश्यक आहे.
-हर्बल चहा पिण्यामुळे आपल्या शरीराचे कमी नुकसान होते आणि आपल्या शरीरातील विषाक्त्यापासून मुक्त होण्यास मदत होते. याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होईल जो आपल्या मेंदूतुन भांगचा प्रभाव कमी करण्यास मदत करतो. ग्रीन टी किंवा कोणतीही हर्बल चहामधील अँटीऑक्सिडंट्स भांगचा प्रभाव कमी होईल.
-होळीच्या निमित्ताने आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घरात अनेक पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमध्ये गुजिया, चिल्लई, पकोडे इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. म्हणूनच होळीचा खास आनंद साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह घरच्या घरी खास पदार्थ बनवू शकता. तसेच, खास जेवणाचे आयोजन करू शकता आणि घरीच सुरक्षितपणे हा उत्सव साजरा करू शकता
-होळीच्या सणाची धमाल गाणी इंटरनेटवर आढळतात. ‘रंग बरसे’ ते ‘अंग से अंग लगाना’पर्यंतच्या सगळ्या गाण्यांची आपण होळी प्लेलिस्ट तयार करू शकता आणि होळीच्या या खास गाण्यांवर आपल्या परिवारासह धमाल डान्स करू शकता. आपल्या होळीच्या उत्सवाला आणखी खास करण्यासाठी रंगीबेरंगी पिचकाऱ्या आणि मजेदार प्रॉप्स खरेदी करा. लहान मुलांबरोबर लहान व्हा आणि ही होळी मजेशीर मार्गाने घरीच साजरी करा.
संबंधित बातम्या :
Video | पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, शिल्पा शेट्टीने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा!#BellyFat | #WeightLoss | @TheShilpaShetty | #yoga | #fitness https://t.co/jvkuwZDq5t
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
(Follow these tips to get rid of hangovers after consuming cannabis for Holi)