पपईच नाहीतर पपईच्या बिया आणि सालही आरोग्यासाठी फायदेशीर!

पपई हे जवळपास सर्वांचे आवडतीचे फळ आहे. पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात.

पपईच नाहीतर पपईच्या बिया आणि सालही आरोग्यासाठी फायदेशीर!
पपई
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 5:07 PM

मुंबई : पपई हे जवळपास सर्वांचे आवडतीचे फळ आहे. पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, फक्त पपईच नाही तर त्याच्या बिया आणि पपईचे साल देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपईच्या बियामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबरसह अनेक महत्त्वपूर्ण घटक असतात. (Health Benefits for papaya seeds and peel)

काही अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, पपईच्या बियामध्ये असलेल्या पोषक आणि अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोग रोखण्यास मदत होते. पपईच्या बिया त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. पपईच्या बिया नियमित खाल्लावर त्वचेची चमक कायम राहते आणि सुरकुत्या देखील दूर होतात.

पपईची साल स्वच्छ करून बारीक करून घ्या आणि पेस्ट तयार करा. मग त्यात लिंबू आणि मध घाला आणि चेहऱ्यावर लावा. जर आपल्याकडे वेळ नसेलतर तर आपण हलक्या हातांनी त्वचेवर देखील घासू शकता. जे कोरड्या त्वचेला ओलावा देते. त्वचेची टॅनिंग देखील काढून टाकते.

पपईच्या बिया खाण्यापूर्वी त्या कशा खाव्यात आणि त्यांचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे, हे माहित असणे आवश्यक आहे. पपईच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी आपण आपल्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते सांगतील त्याप्रमाणेच पुढील कृती करावी. तथापि, पपईच्या बिया सामान्यत: वाटून, किंवा रस करून सेवन करतात येतात.

पपईच्या बिया अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध असतात, म्हणून त्या शरीरातील रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याच बरोबर आपल्या शरीराला सामान्य सर्दी, सौम्य खोकला, सर्दी या आजारांपासून दूर ठेवतात. यात जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे आपली पाचक तंत्र आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी तरुण दिसू शकतो. पपईमध्ये उपलब्ध असलेले क्यारोटीन हे फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सरपासूनदेखील बचाव करते.

संबंधित बातम्या : 

(Health Benefits for papaya seeds and peel)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.