christmas | ख्रिसमसनिमित्त घरच्या घरी बनवा चॉकलेट आणि बच्चेकंपनीला करा खूष
बाजारात आजकाल सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहे. फराळापासून ते चॉकलेटपर्यंत सगळं बाजारात मिळतं. पण घरात एखादा पदार्थ बनवला तर त्याची बातच काही औरच असते. तर आज ख्रिसमसनिमित्त आपण बच्चेकंपनीना खूष करण्यासाठी घरच्या घरी चॉकलेट बनवूयात.
ख्रिसमस तसा तर हा खिश्नचनांचा सण. पण तो सगळ्यांना खूप आवडतो. या ख्रिसमिसनिमित्त बाजारात वेगवेगळे केक आणि चॉकलेट मिळतात. पण एखादी गोष्टी आपण घरी केली आपल्या हाताने बनवली तर त्याची मजाच काही औरच असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट्स आवडतात. आज आपण बच्चकंपनींसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने चॉकलेट बनवूयात.
डार्क चॉकलेटची विधी साहित्य 1/4 कप कोको पावडर 1/4 कप पिठी साखर 1/4 कप अनसाल्टेड बटर व्हॅनिला इसेन्स
पहिले एका भांड्यात कोको पावडर आणि पिठी साखर मिक्स करा. आणि दुसरीकडे गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा. हे पाणी उकळायला लागल्यावर त्यावर अजून एक खोल भांड ठेवा. हे भांड गरम झाल्यावर यात बटर गरम करा. बटर पातळ झाल्यावर त्यात कोको पावडर आणि पिठी साखरचं सारण मिक्स करा. हे चांगलं मिक्स झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स टाका आणि हे सगळं साधारण 1 मिनिटं छान गरम करुन घ्या. त्यानंतर ते गॅसवरुन खाली उतरवा. बाजारात चॉकलेटसाठी वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड मिळतात. तुम्हाला हवं ते मोल्ड घ्या आणि त्यात हे चॉकलेट टाका आणि व्यवस्थित स्टे होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तासाभराने तुमचं चॉकलेट खाण्यासाठी तयार होणार.
झटपट बनवा चॉकलेट साहित्य एक कप डार्क चॉकलेट एक कप मिल्क चॉकलेट बारीक चिरलेला काजू बारीक चिरलेला बदाम मनुक्के चॉकलेट मोल्ड चॉकलेट बनविण्याची विधी
एका भांड्यात डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट मेल्ट करा. हे मेल्ट करण्यासाठी तुमच्याकडे ओवन असेल तर त्यात करा. अन्यथा एका भांड्यात पाणी घ्या ते गॅसवर गरम करा. मग एका काचेच्या भांड्यात डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट घ्या. हे काचेचं भांड त्या गरम पाण्याचा भांड्यात ठेवा आणि चमचाच्या साहाय्याने मेल्ट करा. हे चॉकलेट मेल्ट झाल्यावर गॅस बंद करा. या मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये ड्राई फ्रूट्स टाका आणि हे मिश्रण मोल्डमध्ये टाका. त्यानंतर तासाभरासाठी हा मोल्ड फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे सगळ्यांचा आवडीचे चॉकेलट खाण्यासाठी तयार झालं.