Worst Food for Sleeping Problems: शांत झोप हवी असेल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ  

रात्री झोपेतून सारखी जाग येणं किंवा नीट झोप न लागणं हे चांगल लक्षण नाही. रात्रीच्या जेवणात खाल्लेल्या काही पदार्थांचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही पदार्थ खाणं टाळलेलंच बरं.

Worst Food for Sleeping Problems: शांत झोप हवी असेल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ   
sleeping problemImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 3:47 PM

शांत झोप ही चांगल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. झोप ही शरीरासाठी औषधासारखं काम करते, कारण झोपेत असतानाही शरीराचे स्व-दुरूस्तीचे काम सुरू असते. रात्री नीट झोप न लागणे (Sleeping Problems) किंवा सारखी जाग येणे चांगले नाही. त्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक दुखण्यांना आमंत्रण मिळू शकते. रोज 8 तास झोप (8 hours sleep) घेणे आपल्या शरीरासाठी आवश्यक असून ती पूर्ण न झाल्यास त्रास होऊ शकतो. रात्रीच्या वेळेस काही ठराविक अन्नपदार्थ (food) खाल्ल्यास त्याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात काही पदार्थ टाळल्यास चांगली, शांत झोप लागू शकते व पुढे होणारा त्रास टळू शकतो. हे 8 पदार्थ करा पूर्णपणे बॅन

मद्यपान

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आणि शांत झोप लागावी यासाठी जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान करत असाल, तर हे अतिशय चुकीचे आहे. या सवयीमुळे चांगली, शांत झोप तर लागत नाहीच पण त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होतो. मद्यामध्ये कॅलरीजही जास्त असतात व त्यामुळे वजन वाढणे तसेच मधुमेह होण्याचा धोकाही संभवतो.

पिझ्झा

बर्गर, पिझ्झा यांसारखे पदार्थ तर कधीही खाणे आरोग्यासाठी चांगले नसतात. पण रात्री झोपण्यापूर्वी ते खाणं तर अजूनच वाईट. मैदा, वेगवेगळे सॉस आणि चीझपासून बनवलेला पिझ्झा, हा जळजळीला कारणीभूत ठरतो. वजन वाढणे, मधुमेह यासह उच्च रक्तदाब असे अनेक आजार यामुळे होऊ शकतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी हे पदार्थ न खाणंच चांगलं.

हे सुद्धा वाचा

चिप्स आणि नमकीन

रात्री जेवणानंतर जर तुम्हाला चिप्स, वेफर्स किंवा सटरफटर पदार्थ खायची, चहा पिण्याची सवय असेल, तर ती आजच्या आज बदला. कारण या सर्व पदार्थांचा तुमच्या तब्येतीवर आणि झोपेवर वाईट परिणाम होतो. या स्नॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसोडियम ग्लूटामेट असतं, जे तुमची झोप बिघडवू शकतं. त्यासोबतच या पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढते वजन, अशा समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

ठराविक भाज्या

ब्रोकोली, कोबी यांसारख्या हिरव्या भाज्या तब्येतीसाठी चांगल्या असतात. मात्र त्या रात्री खाल्ल्यास गॅसचा त्रास होऊ शकतो. या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले तर राहते पण त्या भाज्या पचण्यासही जास्त वेळ लागतो. त्यामुळे रात्री या भाज्या खाऊन झोपल्यास पचनाचे विकार होऊ शकतात व त्याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. कांदा, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्या रात्री खाणे टाळावे.

रेड मीट ( लाल मांस)

यामध्ये प्रोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात असते, मात्र रात्री झोपण्यापूर्वी हे खाणं चांगलं नाही. हे खाऊन झोपल्यानंतर त्रास होऊ शकतो व तुमच्या झोपेवर परिणामही होऊ शकतो.

बर्गर किंवा सँडविच

खूप सलॅड घालून केलेला बर्गर हा हेल्दी असतो, असा विचार करून जर तुम्ही ते खात असाल, तर ते चुकीचं आहे. बर्गरमधील फॅटी फीलिंग्ज आणि सॉस त्याची चव वाढवतात, पण ते आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे पोटातील ॲसिड लेव्हल वाढते आणि जळजळ सुरू होते. रात्री असे पदार्थ खाल्ल्यास झोपमोड निश्चित होते.

पास्ता

कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटने भरलेला पास्ता तुमचं पोट तर भरेल पण तुमची झोप आणि आरोग्य दोन्ही खराब करेल. पास्तामधील कार्बोहायड्रेट हानिकारक असतात, जे कोलेस्ट्रॉल, बीपी आणि हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकते. त्याचा ग्लासिमिक इंडेक्स खूप जास्त असतो, जो मधुमेहाचे कारण बनू शकतो. पास्ता रात्री खाल्ल्याने ॲसिडीटी आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

चाट – पाणीपुरी

जीभेचे चोचले पुरवणारे चाट- पाणीपुरीसारखे पदार्थ आरोग्यासाठी मात्र हानिकारक असतात, त्यामुळे ते खाणे नेहमीच टाळले पाहिजे. रात्री हे पदार्थ बिलकूल खाऊ नयेत, अन्यथा झोपेवर परिणाम होऊ शकतो.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये अधिक प्रमाणात कॅफेन आणि उत्तेजक पदार्थ असतात. ज्यामुळे हृदयाला आराम न मिळता, ते अधिक कार्यशील बनते आणि मेंदूही ॲक्टिव्ह होतो. दिवसा जरी हे फायदेशीर असले तरी रात्री शांत झोप हवी असेल तर हे डार्क चॉकलेट टाळलेलेचं बरं.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.