Maggi Story | सामान्य जनतेवरील ताण दूर करण्यासाठी झाला होता ‘मॅगी’चा जन्म, ‘या’ काळात झाली भारतात एंट्री!

‘नेस्ले’ (Nestle) ही जगातील सर्वात मोठी खाद्य व पेय पदार्थ कंपनी आहे आणि आता ती पुन्हा वादात सापडली आहे. नेस्लेने स्वतः कबूल केले आहे की, मॅगीसह (Maggi) त्यांची जवळपास 60 टक्के उत्पादने ही मानवी आरोग्यासाठी चांगली नाहीत.

Maggi Story | सामान्य जनतेवरील ताण दूर करण्यासाठी झाला होता ‘मॅगी’चा जन्म, ‘या’ काळात झाली भारतात एंट्री!
मॅगी
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 1:04 PM

मुंबई : ‘नेस्ले’ (Nestle) ही जगातील सर्वात मोठी खाद्य व पेय पदार्थ कंपनी आहे आणि आता ती पुन्हा वादात सापडली आहे. नेस्लेने स्वतः कबूल केले आहे की, मॅगीसह (Maggi) त्यांची जवळपास 60 टक्के उत्पादने ही मानवी आरोग्यासाठी चांगली नाहीत. कंपनीने असेही म्हटले आहे की, काही उत्पादनेही आरोग्यासाठी कधीही चांगली असूच शकत नाहीत (Know the behind story of Maggi instant noodles invention).

2015 मध्येही मॅगीबरोबर असाच मोठा वाद झाला होता आणि मॅगीवर काही काळ पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. या वादग्रस्त मॅगीच्या निर्मितीची कहाणी अत्यंत रंजक आहे. चला तर, सर्व वयोगटाच्या या आवडत्या इन्स्टंट नूडलबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया…

ज्युलियस मॅगीने लावला ‘मॅगी’चा शोध

1872 मध्ये ज्युलियस मॅगी यांनी ‘मॅगी’चा शोध लावला होता. ज्युलियस स्वित्झर्लंडचा एक व्यवसायिक होता आणि मॅगी हे त्याच्या पहिल्या कंपनीचे नाव होते. ज्युलियस मॅगीच्या या कंपनीने पहिले सूप आणि सॉस बनवले होते. ज्युलियस आपल्या कामाचा पाठपुरावा करत हो,ता तो काळ स्वित्झर्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा काळ होता. त्यावेळी स्त्रियांना अनेक तास फॅक्टरीत काम करणे आणि नंतर स्वयंपाकासाठी घरी जाणे फार कठीण झाले होते.

या कठीण काळात देशातील लोकांनी ज्युलियस मॅगीची मदत मागितली. अशा प्रकारे, ज्युलियस दबावात आला आणि त्याने पीठापासून मॅगी नूडल्सचा शोध लावला. ज्यूलियस यांनी या उत्पादनाचे नाव आपल्या आडनावावरून ठेवले होते. 1897 मध्ये जर्मनीमध्ये पहिल्यांदाच मॅगी नूडल्स लाँच केले गेले (Know the behind story of Maggi instant noodles invention).

नेस्लेने 1947 मध्ये विकत घेतली ‘मॅगी’

ज्युलियसचा पहिले उत्पादन होते ‘रेडिमेड सूप’. हे सूप त्याने आपल्या फिजीशियन मित्र फ्रिडोलिन शुलरच्या सल्ल्यानुसार तयार केले होते. मात्र, मॅगी नूडल्स अवघ्या दोन मिनिटांत तयार झाल्या आणि सर्वांनाच हे उत्पादन आवडले. सन 1912पर्यंत मॅगीने अमेरिका आणि फ्रान्समध्ये पाऊल ठेवले होते. मात्र, ज्युलियस त्याच वर्षी मरण पावला. 1947मध्ये ‘नेस्ले’ कंपनीने मॅगी विकत घेतली आणि मॅगी प्रत्येक स्वयंपाकघरात पोहोचली. ज्युलियसने त्याच्या मृत्यूपूर्वी अमेरिकेव्यतिरिक्त पॅरिस, बर्लिन, सिंगेन, व्हिएन्ना आणि लंडन येथे मॅगीची कार्यालये उघडली होती.

‘मॅगी’चे भारतात आगमन

1984 मध्ये मॅगीने भारतीय बाजार पेठेत प्रवेश केला. त्यावेळी नेस्लेलासुद्धा अशी अपेक्षा नव्हती की, त्यांचे उत्पादनात या देशात इतके प्रेम मिळवेल. दरवर्षी नेस्ले इंडिया जाहिरातींवर तब्बल 100 कोटी रुपये खर्च करते, त्यातील प्रमुख भाग म्हणजे मॅगी. 1999पासून भारतातील मॅगीची संपूर्ण बाजारपेठ बदलली. याच काळात मॅगीने भारतातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ऑक्टोबर 2008 मध्ये मॅगीपासून स्नायू आणि हाडांना इजा होण्याचा धोका असल्याचे सांगून ब्रिटनच्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड अथॉरिटीने (ASA) बंदी घातली होती.

(Know the behind story of Maggi instant noodles invention)

हेही वाचा :

Photo । बर्फाळ रस्ते, नदी आणि डोंगरातील दुर्गम मार्ग पार करत आरोग्य कर्मचारी करताहेत ड्युटी

SBI Alert : या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड, चेक करा तुमचेही नाव आहे का?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.