हिवाळ्यात गाजराचं लोणचं कधी ट्राय केलं आहे का? करून घ्या हे चटकमटक आणि लज्जतदार लोणचं

हिवाळ्या म्हटलं की बाजारात अगदी फ्रेश आणि ताज्या भाज्या दिसतात. असं वाटतं सगळं घ्यावं आणि वेगवेगळे पदार्थ तयार करावेत. हिवाळ्यात सगळ्यात जास्त होणारा पदार्थ म्हणजे गाजर का हलवा. हो हिवाळ्यात हा प्रत्येक घरात बनत असतो. पण तुम्ही कधी गाजराचं लोणचं केलं आहे. चटकमटक आणि लज्जतदार असं हे लोणचं गरम गरम पराठ्यासोबत सॉलिड लागतं.

हिवाळ्यात गाजराचं लोणचं कधी ट्राय केलं आहे का? करून घ्या हे चटकमटक आणि लज्जतदार लोणचं
गाजरचं लोणचं
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 3:53 PM

अनेकांना जेवण्यात लोणचं खायला खूप आवडतं. लोणचं जेवण्याचा आनंद वाढतो. लोणचं भात, लोणचं पराठा असं अनेक प्रकारे आपण लोणचं खातो. हिवाळ्यात लोणचं खाण्याची मजाच काही और असते. हिवाळ्या आवळा, मिक्स लोणचं अशी अनेक लोणचं बनवली जातात. हिवाळ्यात गाजरचं (carrot)खूप छान मिळतात. या गाजरपासून आपण कायम गाजर हलवा बनवतो. अगदी गाजरचा रायता, गाजरची कोशिबीर असं पदार्थ बनवतो. तुम्ही कधी गाजराचं लोणचं (carrot pickle)ट्राय केलं आहे का?. आज आम्ही तुम्हाला खास गाजराचं लोच्याची रेसिपी (carrot pickle recipe )सांगणार आहोत. आजच बनवा आणि घरच्यांना सप्रराईज द्या. गाजरामध्ये खूप जास्त फायबर्स असतात, त्यामुळे वेटलॉससाठी गाजर चांगलं आहे. पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शियम हे गाजरमध्ये सर्वाधिक असतं

गाजराचं लोणचं

साहित्य 300 ग्रॅम चिरलेली गाजर

1/2 टीस्पून काळी मोहरी

आवश्यकतेनुसार मीठ

1/2 टीस्पून हळद

1 चिमूट हिंग

3 चमचे मोहरी तेल

1/2 टीस्पून लाल तिखट

1 टीस्पून आमचूर पावडर

1 टीस्पून एका बडीशेप

कसे बनवाल गाजर लोणचं

3 स्टेपमध्ये झटपट तुम्ही हे लोणचं बनवू शकता. या लोणच्यासाठी गाजराचे छोटे छोटे तुकडे कापावे. नाही तर तुम्ही गाजर किसून पण हे लोणचं बनवू शकता. स्टेप – 1 गाजर कापा प्रथम गाजर धुवून मग ते टॉवेलने चांगले कोरडे करा. आता गाजराचे लहान बोटाच्या आकाराचे तुकडे कापा.

स्टेप – 2 आता मसाल्याची तयारी एका भांड्यात आता गाजर घ्या. त्यात काळी मोहरी, लाल तिखट, मीठ आमचूर पावडर, हळद, बडीशेप आणि हिंग मिक्स करा. आता मोहरीचं तेल गरम करा आणि ते थंड झाल्यावर या गाजरमध्ये घाला.

स्टेप – 3 लोणचं तयार हे लोणचं हवाबंद डब्यात ठेवा. हा डब्या 3-4 दिवस उन्हात ठेवा.

गाजर खाण्याचे फायदे

– गाजरामध्ये खूप जास्त फायबर्स असतात, त्यामुळे वेटलॉससाठी गाजर चांगलं आहे. – पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शियम हे गाजरमध्ये सर्वाधिक असतं – रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गाजर बेस्ट – जंत झाल्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास गाजराचा एक कप ज्यूस उच्चम – दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी गाजर फायदेशीर

संबंधित बातम्या :

गरोदरपणात ‘ही’ लक्षणं आढळल्यास सावधान!, बाळावर होऊ शकतो गंभीर परिणाम

हार्ट अटँक आल्यावर पहिल्या 15 मिनिटात करा या 5 गोष्टी, वाचू शकतात प्राण

सर्दी, खोकला अन् तापही असताना कोरोना टेस्ट केली नाही? नव्या सर्वेक्षणांतून तीन महत्त्वाची कारणं उघड

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.