Tea | नको जिम, नको डाएट, आठ प्रकारचे चहा पिऊन पोटावरची चरबी कमी करा

ना डाएटचे टेन्शन ना जिम, हे आठ प्रकारचे चहा प्या आणि पोटाची चरबी घटवा. वजन कमी करण्यासाठी खूप उपाय आहेत. चहाच्या नियमित सेवनाने तुमचे पोट आणि कमरेच्या चरबीसह शरीरातील अतिरिक्त कँलरीज कमी होण्यास मदत होते.

Tea | नको जिम, नको डाएट, आठ प्रकारचे चहा पिऊन पोटावरची चरबी कमी करा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 7:45 AM

मुंबई : वजन वाढणे ही अलीकडे खूप मोठी समस्या झाली आहे. प्रत्येक दुसरी व्यक्ती वजन वाढल्याने त्रस्त आहे. लॉकडाऊनमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे खूप जणांना या त्रासातून जावे लागत आहे. वजनवाढ केवळ सौंदर्याला बाधा नाही येत तर गंभीर आजारांना निमंत्रण देणार ठरू शकते. वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, डायबेटीज, कँन्सर सारख्या आजार ओढवू शकतात.

वजन घटवण्यासाठी जिम, डाएट प्लान, योग, झुंबा सारखे उपाय आहेत. यामुळे वजन कमी होत असले तरीही मेहनत, वेळ आणि खर्च होतो. तुम्ही पण अतिरिक्त वजन वाढल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘ चहाचे ‘ काही प्रकार तुम्ही नक्की ट्राय करायला हवे. पाण्यासोबतच चहा सर्वाधिक घेतले जाणारे पेय आहे. संपूर्ण जगातच चहाचा आनंद घेतला जातो. चहाला आरोग्यपूरक समजले जाते. चहामुळे लाल रक्तपेशींना नुकसान पोचू देत नाही. तसेच चहाचे सेवन वजन कमी करून पोटाचा घेर कमी करण्यास मदत करतो असेही म्हटले जाते. पण वजन कमी करण्यासाठी आपण दररोज घेतो तो चहा नव्हे चहाचे वेगळे प्रकार घ्यावे लागतील.

ग्रीन टीः ग्रीन टीचे शरीराला खूप फायदे होतात. जेव्हा वजन कमी करायचे असेल तेव्हा तर ग्रीन टी तर हवाच. या चहामध्ये (रसात) कैटेचिनचे प्रमाण जास्त असते. कैटेचिन नैसर्गिक अँन्टीअॉक्सिडंन्ट असतात. त्यामुळे चयापचय सुधारते. विशेषतः पोटावर जमलेले अतिरिक्त चरबी कमी करते.

पु एर चहा ( Pu-erh Tea): पु एर नावाचा चहा इराणच्या पु-एर शहराच्या नावावरून पडले आहे. इथे हा चहा जेवणानंतर सेवन केला जातो. प्राणी आणि माणसावर केलेल्या अभ्यासानंतर असे लक्षात आले की, हा चहा वजन घटवण्यासाठी मदत करतो. जेवणानंतर स्निग्धाचे चरबीत बदलण्याची प्रक्रिया रोखतो. यामुळे वजन नियंत्रित राहते असे म्हणतात.

ब्लॅक टीः पोषक तत्वांनी युक्त असतो. ग्रीन टी किंवा पांढरा चहा पेक्षा वेगळा असतो. हा चहा पण वजन घटवण्यासाठी मदत करतो. या चहामध्ये फ्लेवोनाइडस नावाचा अँंन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पॉलीफेनेल्स नावाच्या शॉर्ट चेन फॅटी अॅसिडला निर्माण करण्यासाठी मदत करतो. यामुळे शरीराच्या चयापचयास मदत होते.

ऊलौंग टीः ऊलौंग टी पारंपरिक ‘चीनी टी’ आहे. वेगवेगवेगळ्या अभ्यासातून हे दिसून आले की, ऊलौंग टी चरबी घटवतो. कँलरीज बर्न होत असल्याने चयापचय वेगाने होते. साहजिकच यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. या चहामध्ये कैटेचिन आणि कँफिन दोन्ही घटक भरपूर प्रमाणात असतात.

पांढरा चहा: या चहाची प्रक्रिया खूप हलकी असते. या चहाची चव सुद्धा इतर चहापेक्षा खूप वेगळी आहे. या चहाच्या फायदे काय आहेत याविषयी वर्षभर संशोधन केले जाते. यामध्ये कैटेचिन असल्याने वजन झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे हा चहा प्रभावी ठरतो.

रूईबोस चहाः हा हर्बल टी असून दक्षिण आफ्रिकेतील दाट झाड आणि त्याच्या पातळ तणांपासून तयार केला जातो. याही चहा औषधी गुणधर्म आहेत. या चहामध्ये एस्पलाथिन आणि नोथोफँगिन सारखे अँन्टीअॉक्सिडंन्ट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे डीएनएला नुकसान पोहोचवणार्या फ्री ऑक्सिजन रेडिकल्सला नष्ट करण्यास मदत होते. याही चहाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.

माचा टीः यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. 1 ग्रँम माचा टीमध्ये 3 कँलरीज असतात. एपिगैलोकँटेचिन गँलेट सारखा उपयुक्त अँन्टीअॉक्सिडंन्ट असल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते.

लेमन बाम टी – ही आयुर्वेदिक औषधी आहे. ही औषधी मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी उपयोगी पडते. या मध्ये तणाव कमी करून शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच केसांची पोत सु़धारून पचन प्रक्रिया सुरळीत होते. यामुळे पोट चांगले साफ होते.शरीर डिटॉक्स म्हणजे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकून हा चहा चांगल्या अँन्टीअॉक्सिडंन्टचे काम करतो. आणि प्रतिकारशक्ती वाढते.

संबंधित बातम्या :

पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान; फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्तीच शरीराला पोहोचवतीये हानी

सावधान! तुम्हीही रोज सकाळी झोपेतून उशिरा उठता? तर होऊ शकतो मधुमेह; ब्रिगहॅम विद्यापीठाचा अहवाल

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.