Weight Loss आणि प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी या हिरव्या भाज्या आहारात असायलाच हव्या

हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर तसेच प्रथिने (प्रोटीन) आढळतात. त्यामुळे नेहमी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरजदेखील पालेभाज्यांतून पूर्ण होत असते.

Weight Loss आणि प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी या हिरव्या भाज्या आहारात असायलाच हव्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 3:34 PM

मुंबई : सकस आहाराच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने (Protein), फायबर, जीवनसत्वे आदींची आवश्‍यकता असते. अनेकदा त्यांच्या कमतरतेमुळे आपल्याला कृत्रिमरित्या त्यांची कमी भरुन काढावी लागते. प्रोटीनचे शरीरासाठी खूप महत्व आहे. शरीरातील अनेक कार्यांसाठी प्रोटीन आवश्‍यक असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन केले पाहिजे. प्रोटीनयुक्त आहार वजन कमी (weight loss) करण्यास मदत करतो. शरीराला बळकटी (muscle gain) देतो तसेच हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. मांसाहारी लोकांना प्रोटीन पुरेशा प्रमाणात मिळत असते. परंतु शाकाहारी लोकांना प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी प्रोटीनयुक्त हिरव्या भाज्यांवर अवलंबून रहावे लागत असते.

पालक

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. 1 कप म्हणजे 180 ग्रॅम पालकामध्ये 5.3 ग्रॅम प्रोटीन, 41 कॅलरीज आणि 4.3 ग्रॅम फायबर असते हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. यामध्ये असलेले फायबर भूक कमी करून वजन कमी करण्यात मदत करते.

वाटाणा

वाटणादेखील प्रोटीनने भरपूर असतो. अनेकांच्या आहारात वाटाणा असतोच. 1 कप (160 ग्रॅम) वाटाण्याच्या दाण्यामध्ये 134 कॅलरीज, 8.6 ग्रॅम प्रोटीन आणि 8.8 ग्रॅम फायबर असते. त्यात सोडियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम देखील खूप जास्त आहे. वाटाणे हिवाळ्यात पिकतात, पण बरेच लोक ते सोलून साठवतात व बाराही महिने त्याचा वापर करतात.

ब्रोकोली

ब्रोकोली ही फुलकोबीच्याच आकाराची असते. परंतु ती पांढरी नसून तिचा रंग गडद हिरवा असतो. एक कप म्हणजे 156 ग्रॅम बोकलीत 55 कॅलरीज, 3.7 ग्रॅम प्रोटीन, 5.1 ग्रॅम फायबर 1 आढळतात. याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

मोड आलेले अल्फल्फा

मोड आलेल्या अल्फल्फामध्ये खूप कमी कॅलरीज आढळतात आणि त्यामध्ये पोषक तत्वे खूप जास्त प्रमाणात आढळतात. 100 ग्रॅम अल्फल्फा स्प्राउट्समध्ये केवळ 23 कॅलरीज आणि 4 ग्रॅम प्रोटीन आढळतात. यासोबतच व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फोलेट, आयरन, मॅग्नेशियम, झिंक आणि कॉपर देखील यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. यांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

लिमा बीन्स

लिमा बीन्सना मराठीत पावटा असेही म्हणतात. 1 कप म्हणजे 170 ग्रॅम बीन्समध्ये 12 ग्रॅम प्रोटीन, 9 ग्रॅम फायबर असते. हे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते तसेच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. यामुळे वजनदेखील कमी होत असते. त्यात लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, थायामिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील जास्त असतात.

फुलकोबी

ब्रोकोलीप्रमाणेच फुलकोबीमध्येही भरपूर प्रोटीन असते. 1 कप म्हणजे 107 ग्रॅम फुलकोबीमध्ये 2 ग्रॅम प्रोटीन आढळते. याशिवाय, हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन केचा एक चांगला स्रोत आहे.

संबंधित बातम्या :

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे तुमचे डोळे राहतील निरोगी, दृष्टी देखील सुधारेल

आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होईल मदत

हो खरयं… आता वेळ आलीयं ‘मास्क फ्री’ जगण्याची… काय आहे नेमका दावा…

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.