Vitamin B12 Deficiency : शरिरासाठी व्हिटॅमिन बी 12 महत्वाचे शाकाहारी लोकांनी त्याची कमतरता कशी दूर करावी, वाचा याबद्दल सविस्तर!

व्हिटॅमिन बी 12 ला कोबालामीन (Cobalamin)असेही म्हणतात. शाकाहारी आहारातून व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, बहुतेक लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता असते आणि यामुळे अनेक समस्या उद्भवतात. येथे जाणून घ्या व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी महत्वाचे का आहे, हे आपण बघणार आहोत.

Vitamin B12 Deficiency : शरिरासाठी व्हिटॅमिन बी 12 महत्वाचे शाकाहारी लोकांनी त्याची कमतरता कशी दूर करावी, वाचा याबद्दल सविस्तर!
आहार
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 8:02 AM

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारची जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, फायबर आणि कार्ब्स इत्यादींची गरज असते. बहुतेक पोषक तत्त्वे सहसा अन्न आणि पेयातून मिळतात. परंतु व्हिटॅमिन बी 12 हे एक असे जीवनसत्व आहे जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. पण सहसा ते शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये नसते. (Vitamin B12 is essential for the body)

व्हिटॅमिन बी 12 ला कोबालामीन (Cobalamin)असेही म्हणतात. शाकाहारी आहारातून व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, बहुतेक लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता असते आणि यामुळे अनेक समस्या उद्भवतात. येथे जाणून घ्या व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी महत्वाचे का आहे, त्याच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्याची कमतरता कशी पूर्ण केली जाऊ शकते.

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची भूमिका

शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि मज्जासंस्था निरोगी बनवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 विशेष भूमिका बजावते. हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. मेंदूचे नुकसान आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 उपयुक्त असल्याचे मानले जाते. या व्यतिरिक्त, यामुळे तणाव कमी होतो, म्हणून या जीवनसत्त्वाला तणाव विरोधी जीवनसत्व असेही म्हणतात.

ही लक्षणे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दर्शवतात

अशक्तपणा, थकवा, शरीराची कमजोरी, भूक न लागणे, चिडचिडेपणा, मुंग्या येणे, अंगात कडकपणा, केस गळणे, तोंडात व्रण, बद्धकोष्ठता, स्मरणशक्ती कमी होणे, जास्त ताण, डोकेदुखी, श्वासोच्छवास, त्वचा पिवळी पडणे, डोळ्यांची दृष्टी ही त्याची मुख्य लक्षणे मानली जातात. जर तुम्हालाही असे काही घडत असेल तर तज्ञांशी सल्ला लगेचच घ्या.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची कारणे

व्हिटॅमिन बी 12 मुख्यतः मांसाहारी गोष्टींमध्ये आढळत असल्याने, शाकाहारी लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता असते. याशिवाय जर तुम्ही कोणतीही शस्त्रक्रिया केली असेल तर शरीरातील लाल रक्तपेशी कमी होते. या स्थितीमुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता कशी पूर्ण होईल

व्हिटॅमिन बी 12 मासे, चिकन, अंडी आणि कोळंबीमध्ये आढळते. जर तुम्ही मांसाहारी असाल तर या गोष्टी खा. शाकाहारी लोक काही प्रमाणात दही, ओटमील, सोयाबीन, ब्रोकोली आणि टोफू खाऊन ही कमतरता भरून काढू शकतात. या व्यतिरिक्त, एक चांगला पर्याय म्हणजे शाकाहारी तज्ञांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी 12 पूरक आहार घेतला पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!

(Vitamin B12 is essential for the body)

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.