Weight Loss | वजन कमी करायचंय? मग, लिंबू पाणी नक्की प्या! जाणून घ्या या बद्दल अधिक…
आपल्यापैकी बरेच जण हे ऐकून मोठे झाले असतील की, एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मधा मिसळून घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. बरेच तज्ज्ञ शिफारस करतात की, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबाच्या पाण्याने करावी.
मुंबई : आपल्यापैकी बरेच जण हे ऐकून मोठे झाले असतील की, एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मधा मिसळून घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. बरेच तज्ज्ञ शिफारस करतात की, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबाच्या पाण्याने करावी. पण खरंच ते पिण्यापासून काही फायदा होतो का? आणि वजन कमी करण्यासाठी ते पिण्याची शिफारस देखील अनेक तज्ञांनी का केली आहे?
आपल्या सर्वांना हे माहित आहे की, लिंबू पाचन तंत्रामध्ये सुधार करते. क्लीन्झरप्रमाणे शरीरास डिटॉक्सिफाय करते आणि लिंबू व्हिटामिन सीचा मुख्य स्रोत आहे. पण, हे वजन कमी करण्यास कशी मदत करते? चला जाणून घेऊया.
लिंबू पाणी का प्यावे?
तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. तर पाण्यात मिसळेले लिंबू केवळ त्याची चवच वाढवत नाही, तर पोटात साठलेली चरबी देखील कमी करते. लिंबूमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी-6, पेक्टिन आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल असते. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स,केवळ फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देत नाही तर, हृदय निरोगी ठेवतात आणि इतर प्रकारच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करतात.
वजन कमी करण्यात फायदेशीर का आहे?
लिंबूपाण्यात अनेक पोषक घटक असतात. पण, ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात पेक्टिन आहे, जे भूक नियंत्रित करण्यात मदत करते आणि जंक फूडची लालसा कमी करते. त्यामध्ये उपस्थित फ्लेव्होनॉइड्स चयापचयला चालना देतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. दररोज लिंबाचे पाणी पिण्यामुळे शरीराची जळजळ कमी होऊ शकते आणि पाण्याचे प्रमाण संतुलित करून विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे काम करते. लिंबामध्ये पोटॅशियम असते, जे वजन कमी करून रक्तदाब नियंत्रित करते आणि शरीराला हायड्रेट ठेवते.
लिंबूपाणी कसे बनवायचे?
अधिक फायदे मिळविण्यासाठी दररोज सकाळी लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते. यासाठी आधी थोडेसे पाणी गरम करावे आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा. तर, वजन कमी करण्यासाठी, एक चमचा जिरे पावडर, लिंबाचे काही तुकडे घाला आणि पाणी चांगले उकळा नंतर ते गाळून घ्या. यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला आणि प्या.
(टीप : कोणत्याही उपायापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Want to lose weight then definitely drink lemon water)
हेही वाचा :
सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि या खोकल्यावरचे घरगुती उपाय