Weight Loss : तुम्हाला वजन कमी करायचे मग या 4 चुका टाळा आणि झटपट वजन कमी करा!
कोरोना (Corona) आणि लाॅकडाऊनमुळे आपल्या सर्वांचा आयुष्यामध्ये खूप जास्त बदल झाले. त्यामध्ये महत्वाचा म्हणजे आपल्याला अगोदर येणारे कपडे आता अजिबात येत नाहीत. जवळपास सर्व कपडे छोटे होत आहेत. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.
मुंबई : कोरोना (Corona) आणि लाॅकडाऊनमुळे आपल्या सर्वांचा आयुष्यामध्ये खूप जास्त बदल झाले. त्यामध्ये महत्वाचा म्हणजे आपल्याला अगोदर येणारे कपडे आता अजिबात येत नाहीत. जवळपास सर्व कपडे छोटे होत आहेत. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामुळे आॅफिस, शाळा आणि काॅलेज (College) सुरू झाले आहे. मात्र, या लाॅकडाऊनच्या (Lockdown) काळात घरामध्ये सतत बसून जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. यामुळे अगोदरचे कपडे देखील येत नाहीयेत.
गेल्या दोन वर्षांत आपल्या रोजच्या सवयी खूप बदलल्या आहेत. ताण वाढला, त्यामुळे आहार, झोपेच्या सवयी, व्यायाम आणि दैनंदिन दिनचर्येत अनेक बदल झाले. निरोगी शरीरासाठी मात्र वजन नियंत्रण खूप महत्त्वाचे आहे. कारण एकदा का वजन वाढायला लागलं की हृदयाच्या समस्या, उच्च रक्तदाब, मधुमेह, पित्ताशयाचा त्रास, श्वासोच्छवासाचा त्रास अशा एकापेक्षा जास्त समस्या निर्माण होतात. त्यामुळे मानसिक चिंता आणि नैराश्य वाढेल. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
वजन कमी करताना या 4 चुका करणे टाळा
- व्यायाम- जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर तुमचे वजन झपाट्याने वाढणारच, यामुळे काहीच शंका नाही. आणि जर तुम्ही आहारामध्ये घेत असलेल्या कॅलरीज बर्न करत नसाल तर वजन तर 100 टक्के वाढणारच. यामुळे व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे.
- फॅट- कमी प्रथिने, उच्च कार्ब आणि उच्च चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या देखील उद्भवतात. परिणामी चरबी जमा होते. बिस्किटे, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड हे पदार्थही मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. यामुळेच आपले वजन झटपट वाढण्यास सुरूवात होते.
- कमी झोप – कमी झोप ही आजकाल अनेकांना समस्या आहे. झोप नीट झाली नाही तर शरीरामध्ये चरबी जमा होण्यास सुरूवात होते. यामुळे शक्यतो रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. सकाळी उठल्यावर दररोज व्यायाम करा.
- ताण – जसा जसा आपला ताण वाढतो तसे जंक फूड, फॅट कॅलरीज जास्त घेतो. कॉर्टिसॉल हार्मोन्स नीट काम करत नाहीत. अतिरिक्त कॅलरीज पोटाभोवती जमा होऊ लागतात. झोप कमी लागते. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये ही समस्या सर्वात जास्त आढळते.
संबंधित बातम्या :
Skin care उन्हाळ्यात त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा नक्कीच करून पाहा! Health Care : या जीवनसत्वाची कमतरता आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा हे जीवनसत्व नेमके कोणते?