Lifestyle of Lata Mangeshkar : लतादीदी नव्वदीनंतरही अगदी निरोगी होत्या, त्यांनी त्यांचा तंदुरस्तपणा कसा जपला होता ते जाणून घ्या
लता मंगेशकर गेल्या कित्येक वर्षापासून त्या अत्यंत साधं जीवन जगत होत्या. जसजशा त्या मोठ्या होत गेल्या तसतश्या त्यानी त्यांच्या आहारावर त्यांनी खूप नियंत्रण ठेवले पण कोरोनाचा फटका बसल्यानंतर ती जीवनाची लढाई हरली.
मुंबईः लता मंगेशकर गेल्या कित्येक वर्षापासून त्या अत्यंत साधं जीवन जगत होत्या. जसजशा त्या मोठ्या होत गेल्या तसतश्या त्यानी त्यांच्या आहारावर त्यांनी खूप नियंत्रण ठेवले पण कोरोनाचा फटका बसल्यानंतर ती जीवनाची लढाई हरली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आता आमच्यात राहिल्या नाहीत. आज 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मागील महिन्याच्या 8 जानेवारीला त्या मुंबईतील ब्रिच कँडी (Breach Candy Hospital Mumbai) रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्या कोरोना (corona) आणि न्यूमोनियाग्रस्त (Pneumonia) होत्या. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता, आणि त्यामुळेत नंतर त्यांना कोरोनाची लागण झाली, मृत्यूबरोबर झुंद देत त्या अखेर आज शांत झाल्या. त्यांच्या निधनामुळे जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी 92 वर्षाचं आयुष्य लाभलं, एवढ्या काळात त्या कधीच आजाऱ्या पडल्या नाहीत. त्या महान गायिका असल्या तरी त्यांनी खूप साधं आयुष्य जगल्या आहेत. लतादीदींना मासे आणि चटपटीत असं खाण्याचा छंद होता, मात्र जसजस वय होत गेलं तसं त्यांनी आपल्या खाण्यावर काही बंधनं घालून घेतली.
दीदींचा दिनक्रमा हा असो होता
स्वरसम्राज्ञी सकाळी सहा वाजता उठत असत. त्यानंतर सकाळचा नाष्टा करत. दीदींना गुलाबजामून, दहीवडे, फिशकरी, गाजरचा हलवा, जिलेबी, आणि चिकन आवडायचं. पण जसं वय वाढू लागलं तसं त्यांनी मसालेदार पदार्थ, आंबट आणि तेलकट पदार्थ टाळू लागल्या. असं सांगितलं जातं की, त्या पाणी पितानाही गुणगुणत पित होत्या. दुपारच्या जेवणामध्ये त्या अगदी साधं जेवण जेवत होत्या. त्यामध्ये डाळ, भाजी आणि चपाती खात होत्या. रात्रीच्या जेवणाबाबत मात्र त्या वेळ पाळून बरोबर 9.30 वाजताच जेवत होत्या. रात्रीचं फक्त डाळ भात खाण्यालाच प्राधान्य देत.
कोट्यवधींची मालकीन
मुंबईमध्ये राहणाऱ्या लता मंगेशकर यांचे घर दक्षिण मुंबईमधील पेडर रोडवर त्यांचा अलिशान बंगला आहे. त्या अलिशान बंगल्याचं नाव आहे, प्रभू कुंज भवन. त्यांच्याजवळ शेवरले, ब्यूक आणि एक क्रिसलर या कार होत्या. असं म्हटलं जातं की, वीर जारा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्यांना एक मर्सिडीज कार भेट दिली होती, अशा अनेक त्यांच्याकडे महागड्या कार आणि बंगला होता.
गाण्याचा अभ्यास तर रोजचाच
संगीतातील विद्यापीठ असं ज्यांना समजलं जाई त्या लता मंगेशकर या अगदी शेवटपर्यंत गाण्याचा अभ्यास करत. या वयातही त्यांना कार्यक्रमासाठी आज प्रस्ताव येत, त्यांच्या घरात असणाऱ्या साधं आयुष्य त्या जगत होत्या. दिवसभरात त्यांच्या जवळच्या अनेक व्यक्तींना त्या फोन करून त्यांची चौकशी करत आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल त्या ट्विविटही करत असत.
संबंधित बातम्या
VIDEO : भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे – Devendra Fadnavis – Lata Mangeshkar Death