शरीरात हे बदल दिसताच, तुम्ही वेळीच सावध व्हा; जीवघेण्या आजाराला पडू शकता बळी
कोणत्याही व्यक्तीला तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला लागला असेल आणि खोकल्यानंतर थुंकीवाटे रक्त येत असेल तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचेही ते लक्षण असू शकते.
मुंबईः बदलत्या हवामानामुळे जगात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे (Lung cancer) प्रमाण प्रचंड वाढले आहे. जगाबरोबरच भारतातही फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने वाढत आहे. त्याचे मुख्य आहे कारण आहे ते म्हणजे माणसांचे धुम्रपान (Smoking). धुम्रमान करणाऱ्यानाच कर्करोग होतो असं नाही तर धुम्रमपान न करणाऱ्या लोकांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. सध्या धावपळीच्या जगात खाण्यापिण्याच्या सवयी बदलून गेल्यामुळे माणसांच्या आयुष्यावर त्याचे विपरित परिणाम होत आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी (Eating habits) असतील तर गंभीर आजारसुद्धा होऊ शकतो. यामध्ये सगळ्यात गंभीर आजार आहे तो म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग. हा आजार इतका गंभीर आहे की, तो प्रारंभीच्या काळात ओळखणे कठीण असेत आणि एकदा झाला की, त्यापासून दूर जाणे अवघड असते.
समाजात असा एक समज आहे की, धुम्रपान करणाऱ्या लोकांनाच कर्करोग होण्याची जास्त शक्यता आहे मात्र ते फार चुकीचे आहेत. कधी कधी दारु, सिगरेट ओढणाऱ्या फुफ्फुसाचा कर्करोग होतोच मात्र कधी धुम्रपान न करणाऱ्या माणसांनासुद्धा हो रोग होण्याची दाट शक्यता असते.
कोरोनाच्या काळात फुफ्फुसाचा कर्करोग झाला हे ओळखणे तसे कठीण आहे कारण तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ तुम्हाला खोकला लागला असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेणे महत्वाचे असते. पण काही लोकं याकडे साफ दूर्लक्ष करतात. त्यामुळे फफ्फुसाची लक्षणे कोणती आहेत त्याची माहिती आम्ही तुम्हाला करुन देणार आहोत.
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका
खोकताना रक्त येणे
कोणत्याही व्यक्तीला तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला लागला असेल आणि खोकल्यानंतर थुंकीवाटे रक्त येत असेल तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचेही ते लक्षण असू शकते. त्यामुळे थुंकीवाटे रक्त येत असतील अशी लक्षणं दिसू लागल्यानंतर तात्काळ तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.
श्वास घेण्यात अडचण
श्वास घेताना छातीमध्ये घरघर वाजत असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या तपासण्या करुन घ्या. फुफ्फुसाला जर सूज आली असेल तर छातीत घरघर वाजण्यास सुरुवात होते. त्यामुळे घसा बंद होतो आणि छातीत आवाज येण्याचे लक्षणे दिसू लागतात.
सतत कमी होत जाणारे वजन
तुम्ही डाएटिंग न करताही वजन झपाट्याने कमी होत असेल तर ते एक फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. भूक न लागणे, वजन कमी होणे या प्रकारची तुम्हाला लक्षणे दिसू लागतात. कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढल्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा नाहीशी होते आणि शरीराला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे झपाट्याने वजन कमी होत असेल तर काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीरात दीर्घकाळ टिकणारे दुखणे
शरीरातील काही अवयव म्हणजे छाती, खांदे किंवा पाठदुखी वारंवार दुखत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. या दुखीमुळे तुमच्या शरीरात दीर्घकाळ वेदना राहिलेली असते. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांना भेटा
फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी…
धूम्रपान
धुम्रपानाची सवय असेल तर त्यापासून तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते. फुफ्फुसाचा कर्करोग टाळायचा असेल तर धुम्रपान करू नका. वेळीच सावध होऊन धुम्रपानाची असलेली सवय तुम्ही जर बंद केली तर कर्करोगाच्या धोक्यापासून तुम्ही वाचू शकता.
योग
शरीरातील अनेक रोग हे व्यायाम किंवा योगासने करुन त्यावर उपाय शोधू शकता. योगासनांमुळे फुफ्फुस मजबूत होऊ शकते, रक्ताभिसरण वाढून, फुफ्फुसात जास्त प्रमाणात ऑक्सिजन पोहचतो.
आरोग्यदायी आहार
शरीराला कोणताही आजार झाला की, तुम्ही आहारात बदल करा. चांगला आणि ताजा आहार घ्या त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो फुफ्फुसाच्या कर्करोगाची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. या रोगाची लक्षणे दिसल्यास दारुचे सेवन अजिबात करु नका.
संबंधित बातम्या
Skin Care for Men : पुरुषांनी त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी? फॉलो करा ‘या’ टिप्स
कॉफीमध्ये ‘हे’ पदार्थ मिसळून हेअर मास्क बनवा, वापरा आणि केसांना चमकदार बनवा…