हिवाळा आला आहे तर मार्केटमधून लिपबाम आणला का? नाही ना? मग थांबा घरी बनवा लिपबाम
हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यात त्वचा आणि ओठ फाटतात. त्यामुळे अशावेळी आपण मार्केटमधून उत्पादने आणतो. ओठांसाठी खास करुन लिपबाम विकत घेतो. मात्र हे लिप बाम आपण लावल्याने ओठ मुलायम राहतील असं नाही. मग आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल असे लिपबाम सांगणार आहोत.
हिवाळा आला की पहिले आपली त्वचा आणि ओठ फाटायला लागतात. अशावेळी आपण बाजारातून अनेक उत्पादनं विकत घेतो. पण हवा तसा फायदा या लिपबामचा होत नाही. आम्ही कायम सांगत असतो किंवा आरोग्य तज्ज्ञांचं हेच म्हणं आहे की, नैसर्गिक आणि घरच्या घरी बनवलेले गोष्टी कायम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे घरच्या घरी लिपबाम कसं बनवता येईल हे सांगणार आहोत. हो बरोबर वाचलं तुम्ही आम्ही घरी कसा लिपबाम बनवता येईल ते शिकवणार आहेत. चॉकलेट लिप बाम यासाठी चॉकलेट, मेण आणि न्यूटेला यांची आवश्यकता आहे. पहिले चॉकलेट मेणामध्ये वितळून त्यात न्यूटेला मिक्स करा आणि एका घट्ट डब्यात हे मिश्रण टाकून ते फ्रीजमध्ये 4 तासांसाठी ठेवा. 4 तासांनंतर चॉकलेट लिप बाम लावण्यासाठी तयार आहे. लिंबू लिप बाम हा बाम बनवण्यासाठी आपल्याला लिंबू, व्हॅसलीन आणि मध हवं आहे. मायक्रोवेव्हमध्ये व्हॅसलीन, मध आणि लिंबूचं मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा आणि ओठांना लावण्यासाठी हा लिपबाम तयार झाला आहे.
गुलाब लिपबाम
सुंगधीत गुलाबांच्या पानांला बदाम तेल, शिया बटर आणि बी-वॅक्स मिक्स करा आणि हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करा आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून घट्ट अशी पेस्ट तयार होईपर्यंत ठेवा. त्यानंतर हा लिपबाम तुमच्या ओठांसाठी तयार झाला आहे.
हळदीचा लिपबाम
हो हळदीचा लिपबाम आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हळदीमध्ये मध, व्हॅसलीन एकत्र गरम करा आणि फ्रीजमध्ये त्याला घट्ट होईपर्यंत ठेवा. या लिपबाममुळे ओठाला खूप फायदा होईल.
बीट लिपबाम
बीटरुटचा रस काढा त्यात खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल असं एकत्र तयार करा. ही पेस्ट तुम्ही लिपबाम म्हणून वापरु शकता.
ग्रीन टी लिपबाम
ग्रीन टी आरोग्यासाठी उत्तम आहे. आणि हो ग्रीन टी लिपबाममुळे ओठांसाठी पण सर्वोत्तम आहे. खोबरेल तेल गरम करुन त्यात ग्रीन टी बुडवून ठेवा त्यात मग मेणही घाला आणि परत एकदा गरम करा. हे मिश्रण थंड झाल्यावर ओठांवर लावल्यास हिवाळ्यात तुमचे ओठ फाटणार नाहीत. या लिपबामपैकी एकतरी लिपबाम तुम्ही करु पहा या हिवाळ्यात तुमचे ओठ सुंदर दिसतील.