मखना आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ, कसा? वाचा…
मखन्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून तुन्ही खाऊ शकता. त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील. मखण्यात ड्रायफ्रुट मिक्स करून तुम्ही एक चांगला पदार्थ बनवू शकता...
मुंबई : मखाना… (Makhana) हेल्दी आणि टेस्टी. मखना जितका आरोग्यासाठी चांगला तितकाच चवदार … मखन्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून तुन्ही खाऊ शकता. त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील. मखण्यात ड्रायफ्रुट (Dry fruit) मिक्स करून तुम्ही एक चांगला पदार्थ बनवू शकता. उपवासासाठी हा उत्तम नाश्ता आहे. मसाले आणि सुका मेवा यांचं मिश्रण तुम्हाला एक खास चव देईल. ज्यामुळे तुम्हाला तृप्त झाल्याचा आनंदही मिळेल. लहान मुलांसाठीही हा एक चांगला नाश्ता आहे. मखना अतिशय पौष्टिक असतो. त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असतात. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहेत. मखन्यात एंटी-एजिंग एंजाइमों गुणधर्म देखील आहेत . प्रथिनेसुद्धा आहेत. हे ग्लूटेन फ्री आहेत. संध्याकाळी एखादं पुस्तक वाचताना एक कप गरम चहासोबत तुम्ही मखान्यापासून बनवलेला हा नाश्ता घेऊ शकता . तुम्हाला नक्की आवडेल. चला जाणून घेऊया या पदार्थाची रेसिपी…
साहित्य-
200 ग्रॅम मखना
चवीनुसार मीठ
1/2 कप मिक्स ड्रायफ्रुट
1 टीस्पून चाट मसाला
1/4 टीस्पून पांढरी मिरी पावडर
1/2 टीस्पून जिरे पावडर
2 चमचे तूप
मखाना स्नॅक्स बनवायची कृती
1. मखाना स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम ड्रायफ्रुट्स घ्या. ते बारीक चिरून घ्या. आता कढई गॅसवर ठेवून त्यात तूप गरम करा.
२. तूप चांगलं गरम झालं की त्यात मखणा टाका आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत तळा. मखना एका मोठ्या भांड्यात काढा. आता कढईत आणखी तूप गरम करा. कढईत चिरलेले काजू घाला आणि ते सोनेरी होईपर्यंत तळा. नंतर त्याच भांड्यात काढा.
3. मखना आणि ड्रायफ्रुट्स एकत्र करून त्यात जिरेपूड, काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. सगळं चांगलं मिसळा आणि तुमचा मखाना स्नॅक्स तयार…
मखन्याचे आरोग्यसाठीचे फायदे मखन्यात आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात. त्यात मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थायामिन, प्रथिने आणि फॉस्फरस असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ते किडनीचे आरोग्य राखण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास, यकृताला डिटॉक्सिफाई करण्यास, हाडे मजबूत करण्यास, वजन कमी करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.
संबंधित बातम्या