काळी मिरी खाण्याचे महत्त्वाचे फायदे जाणून घ्या…
काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते.
मुंबई : काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळीमिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. (Many benefits of eating black pepper)
-गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.
-जर तम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेत तर काळीमिरीचा वापर करून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता. काळीमिरी सेवन केल्याने 3 ते 4 दिवसांतच फरक दिसून येईल
-खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.
-अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल.
-फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता.
-सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल.
-जर घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा.
(टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Many benefits of eating black pepper)