Happy New Year: प्रियजनांना पाठवा नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, खास मराठी संदेश

New Year 2025 Marathi Wishes : सोशल मीडियात नववर्षी अनेक शुभेच्छा संदेश येतात. परंतु मराठी जणांना भावणारे संदेश मायबोली मराठीतून आलेले असतात. या सर्व मराठी जणांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि सोशल मिडियात शेअर करता येणारे संदेश

Happy New Year: प्रियजनांना पाठवा नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, खास मराठी संदेश
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 5:52 PM

Happy New Year 2025 Marathi message: 2024 वर्षाचा आज शेवटचा दिवस. आता 2025 नवीन आशा, अपेक्षा घेऊन येणार आहे. 2024 च्या सुखद आठवणींना उजाळा देत नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई आज करणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतास आता फक्त काही तास राहिले आहेत. त्यानंतर मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या जातात. जे लांब असताना त्यांना विविध माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवले जातात. वाचकांसाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश…

सोशल मीडियात नववर्षी अनेक शुभेच्छा संदेश येतात. परंतु मराठी जणांना भावणारे संदेश मायबोली मराठीतून आलेले असतात. या सर्व मराठी जणांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि सोशल मिडियात शेअर करता येणारे संदेश…

नवीन वर्षाचे स्वागत करताना मागील वर्षाच्या आठवणींचा  कडू गोड आठवणी सोबत असतात. त्यामुळेच नवीन आशा, अपेक्षा, नवीन स्वप्न घेऊन नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरु होते. परंतु जागतीकरणाच्या युगात 1 जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते.

हे सुद्धा वाचा

शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश

दु:ख सारी विसरुन जावू

सुख देवाच्या चरणी वाहू

स्वप्न उरलेली नव्या या वर्षी

नव्या नजरेने नव्याने पाहू

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

…………………….

भिजलेली आसवे झेलून घे

सुख-दुःख झोळीत साठवून घे

आता उधळ हे सारे आकाशी

नववर्षाचा आनंद भरभरून घे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

………………………

नव्या कल्पनांचे मनोरे रचुया

नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया

नवे वर्ष आहे नव्याने आलेले

नवे रंग उधळून स्वागत करुया

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

……………………

नवीन वर्षात नवा संकल्प करुया,

ह्रदयाचा एक छोटासा कप्पा

दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुया

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

…………….

नवी वर्षात आपल नातं असंच राहू दे,

मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे

सुंदर असा प्रवास होता 2024 या वर्षाचा

2025 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

………………………

नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात,

प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो यश

नववर्षात उघडू दे नशीबाचा दरवाजा,

हीच आहे प्रार्थना तुमच्या आमच्या कुटुंबासाठी,

नवीन हार्दिक शुभेच्छा!

……………………..

नव्या या वर्षी

संस्कृती आपली जपू या

थोरांच्या चरणी एकदा तरी

मस्तक आपले झुकवू या

नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार.
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले...
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले....
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?.
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.