जिंदगीभर पैशाची कमी पडणार नाही… फक्त ‘या’ 5 गोष्टी करा
प्रत्येकाला पैसा हवा असतो. पण सर्वांनाच पैशाचं आर्थिक नियोजन करता येतं असं नाही. आर्थिक नियोजन न केल्याने अनेकांची गणितं बिघडतात.
प्रत्येकाला पैसा हवा असतो. पण सर्वांनाच पैशाचं आर्थिक नियोजन करता येतं असं नाही. आर्थिक नियोजन न केल्याने अनेकांची गणितं बिघडतात. आयुष्यभर काम करूनही काहीच हाती न उरल्याने आयुष्याच्या संध्याकाळी मोठी ससेहोलपट होते. त्यामुळे महिन्याच्या शेवटी बचत करणे आवश्यक आहे, पण त्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. आर्थिक नियोजन कसे करायचे? हातात पैसा कसा टिकवायचा याबाबतचे काही सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या. त्यामुळे आपल्याला मासिक खर्च आणि बचत यावर नियंत्रण ठेवता येईल.
खर्चाची तपशीलवार यादी करा
दर महिन्याला कुठे किती खर्च होतो, याची एक लिस्ट तयार करा. काही खर्च असे असतात जे दर महिन्याला ठरलेले असतात आणि ते बदलत नाहीत. या खर्चांपासून इतर खर्च वेगळे करा आणि त्यावर लक्ष ठेवा.
सामान्य बजेट तयार करा
खर्चांची यादी तयार केल्यानंतर, पुढचं पाऊल आहे बजेट तयार करणे. आपल्या उत्पन्नातून किती टक्के पैशांचा खर्च कोणत्या खात्यात केला जाईल, हे आधी ठरवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि आपली बचत नियंत्रित ठेवता येईल.
आपत्कालीन फंड तयार करा
आपत्कालीन परिस्थितीपूर्वीच आपल्या उत्पन्नातून काही पैसे सुरक्षित ठेवा. त्यासाठी एक छोटासा बचत फंड तयार करा. जर अशा परिस्थितीमध्ये पैसे लागले, तर तुम्हाला हे पैसे मदतीला येऊ शकतात. मात्र, अत्यंत आवश्यक नसेल तोपर्यंत त्या पैशांचा वापर करू नका.
दायित्वांकडे लक्ष द्या
क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्ज असताना खर्च करणे चांगले नाही, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. म्हणूनच, महिन्याच्या सुरुवातीला आपले कर्ज ताबडतोब फेडून टाका. आपल्या पैशांचा योग्य वापर करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
बचत करा
आपल्या उत्पन्नातून किती पैसे बचत करायचे हे ठरवून ठेवले पाहिजे. आपला बचत उद्देश साध्य करण्यासाठी, सर्वात पहिलं त्या निश्चित पैशांचा भाग बाजूला ठेवा. यामुळे आपल्याला पैशाची थोडीथोडी साठवण करता येईल आणि आपली आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल.सर्वसाधारणपणे, योग्य नियोजन आणि नियमित देखरेखीमुळे मासिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचत करणे शक्य होते. थोड्या प्रयत्नांनी आपण आपल्या वित्तीय स्थितीमध्ये सुधारणा करू शकता.