लेक ईशाच्या सासरी गुजराती लूकमध्ये दिसल्या कोट्यवधींच्या मालकीण नीता अंबानी; त्यांच्यापुढे स्टाईल सूनाही फिक्या

नीता अंबानी यांच्या गुजरातीची लूकची सर्वत्र चर्चा; मुकेश अंबानी यांच्या पत्नीच्या स्टाईल पुढे दोन सूना देखील फिक्या... पाहा अंबानी कुटुंबाचा रॉयल अंदाज...

लेक ईशाच्या सासरी गुजराती लूकमध्ये दिसल्या कोट्यवधींच्या मालकीण नीता अंबानी; त्यांच्यापुढे स्टाईल सूनाही फिक्या
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 5:28 PM

Nita Ambani Saree look : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. कोणताही कार्यक्रम असला, तर अंबानी कुटुंब एकत्र येवून त्या कार्यक्रमाचा आनंद लूटतात. नुकताच अंबानी कुटुंबातील एक कार्यक्रम पार पडला. ईशा अंबानी (Isha Ambani) आणि आनंद पीरामल यांच्या घरात आयोजित करण्यात आलेल्या कर्यक्रमात नीता अंबानी यांच्यासोबत पूर्ण अंबानी कुटुंब पोहचलं होतं. सध्या अंबानी आणि पीरामल कुटुंबाच्या कार्याक्रमाची जोरदार चर्चा रंगत आहे. (isha ambani in law)

ईशा यांच्या सासरी त्यांची जुळी मुलं कृष्णा आणि आदिया यांच्यासाठी वेलकम पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा प्रत्येकाची नजर अंबानी कुटुंबाच्या स्टाईलवर येवून थांबली. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र अंबानी कुटुंबाच्या स्टाईलची चर्चा रंगलेली आहे. ग्रॅन्ड पार्टीमध्ये मुकेश अंबानी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजामा घातला होता. तर नीता अंबानी यांच्या गुजराती स्टाईलने सर्वांच्या नजरा वेधल्या. (nita ambani daughter)

हे सुद्धा वाचा

नीता अंबानी पार्टीमध्ये कांजीवरम सिल्क साडीमध्ये प्रचंड सुंदर दिसत होत्या. कोट्यवधींच्या मालकीण नीता अंबानी यांचा गुजराती लूक चाहत्यांनी प्रचंड आवडला. पार्टीमध्ये गुजराती लूकमध्ये प्रवेश केलेल्या नीता अंबानी यांच्या स्टाईलने दोन्ही सूनांना मागे टाकलं आहे. ईशा अंबानी यांच्या मुलांच्या वेलकम पार्टीमध्ये श्लोका मेहता यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. (nita ambani instagram)

श्लोका मेहता यांनी पर्टीमध्ये पेपलम स्टाइल टॉप आणि गुजराती पारंपरिक पद्धतीचा स्कर्ट घातला होता. तर आकाश अंबानी यांनी फिक्या हिरव्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातला होता. तर श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांची मुलगा पृथ्वी अंबानी याने पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातला होता.

ईशा अंबानी यांच्या मुलांच्या वेलकम पार्टीमध्ये अंबानी कुटुंबाच्या होणाऱ्या दुसऱ्या सुनेने देखील हजेरी लावली होती. अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मार्चेंट हिने फिक्या हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता. सध्या सर्वत्र ईशा अंबानी यांच्या सासरी पार पडलेल्या पार्टीची चर्चा रंगत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.