AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस गळतीमुळे त्रस्त आहात? मग, आजच कांद्याचा उपयोग करून समस्या करा दूर

अनेक महिला आणि पुरुष केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

केस गळतीमुळे त्रस्त आहात? मग, आजच कांद्याचा उपयोग करून समस्या करा दूर
| Edited By: | Updated on: Mar 31, 2021 | 7:37 AM
Share

मुंबई : अनेक महिला आणि पुरुष केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण जर तरूण वयातच केस गळती होत असेल तर याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक पध्दत सांगत आहोत त्यामुळे तुमची केस गळती थांबू शकते. (Onion juice is beneficial for preventing hair loss)

-तुम्हीही केस गळतीमुळे त्रस्त असाल तर हे उपाय केले तर तुमची केस गळती थांबू शकते. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे. कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

-तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

-कांद्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्रित करून टाळूच्या त्वचेवर लावल्यास केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. यातील पोषक घटक केसांमधील कोंडा कमी करण्याचे कार्य करतात. तसंच केस मऊ व चमकदार होतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा उपाय केल्यास केस लांबसडक व घनदाट होण्यास मदत मिळेल.

-केसगळती व केस कमकुवत होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा. टाळूच्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा न झाल्यास कोंड्यासह अन्य समस्या उद्भवतात. केसांचे नुकसान टाळण्यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये कांद्याच्या रसाचा समावेश करून पाहावा. आपल्या केसांच्या लांबीनुसार कांद्याचा रस घ्यावा. यामध्ये एक ते दोन चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळूसह संपूर्ण केसांवर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि केसांची वाढ देखील चांगली होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Onion juice is beneficial for preventing hair loss)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.