प्रेग्नेंट आहात तर मग सावधान… चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळं, मग कोणती फळं खाण्यासाठी योग्य?

घरात आपण प्रेग्नेंट आहोत असं कळलं, की आता तू दोन जीवाची आहेस त्यामुले दुप्पट जेवलं पाहिजे तू. आणि हे खा ते खाऊ नकोस असे सल्लेही तुम्हाला अनेकांकडून देण्यात येतात. मग अशावेळी कळत नाही काय खायला पाहिजे आणि काय नाही. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तरी साधारणपणे आई-बाळासाठी कुठले फळं या काळात खाली जाऊ शकता आणि कुठली टाळायला पाहिजे. त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.

प्रेग्नेंट आहात तर मग सावधान... चुकूनही खाऊ नका 'ही' फळं, मग कोणती फळं खाण्यासाठी योग्य?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 10:18 PM

मुंबई : प्रेग्नेंट (Pregnant) आहोत हे समजता क्षणी आता आपल्या बाळासाठी काय केलं पाहिजे, काय खालं पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्यामुळे आपलं बाळ निरोगी आणि हेल्दी होईल, असा प्रश्न प्रत्येक गरोदर महिलेला (Pregnant Women) पडतो. अशावेळी घरात मोठे मंडळी असतात हे सगळं सांगायला. अगदी डॉक्टरही वेळोवेळी सांगत असतात काय खालं पाहिजे काय टाळायला पाहिजे. फळंही (Fruits) आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण सर्व साधारण पणे कुठली फळं या दिवसात खावी आणि टाऴावीत याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

कुठली फळं टाळावीत?

प्रेग्नेंट असताना उष्ण पदार्थ टाळायला पाहिजे. मग तसंच उष्ण आणि पचायला जड अशी फळं खायला नको. त्यामुळे गर्भाला त्रास होण्याची अगदी सुरुवातीच्या काळाच गर्भपात होण्याची भीती असते. म्हणून पपई, आंबा, अननस आणि द्राक्ष ही फळं या दिवसांमध्ये खाणं टाळावीत.

कुठली फळं खाल्याने होणार फायदा?

व्हिटॅमिन-सीयुक्त फळं खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. तसंच फायबर, फोलेट आणि लोह यांचा चांगला स्त्रोत असलेली फळं आई आणि बाळासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे रोज आहारात फळाचा समावेश करावा. मोसंबी, चिकू, कलिंगड, स्ट्रॉबेरी, डाळिंब, सफरचंद, सीताफळ, पेअर, पेरु, किवी आणि केळी ही फळं खायला पाहिजे. तर ब्लूबेरी, चेरी, अवोकाडो ही फळं पण तुम्ही खाऊ शकता.

हे कायम लक्षात ठेवा

प्रत्येकाची शरीराची अवस्था, प्रेग्नेंसीमधील समस्या, तुम्हाला इतर होणार त्रास यानुसार तुमचा आहार असावा. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट करु नका.

गर्भधारणेदरम्यान सेक्स सुरक्षित?

गर्भवती असताना सेक्स करु नये, तो धोकादायक असल्याचं मेडिकल सायन्स साफ नाकारतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेच्या कुठल्याही स्टेजवर करण्यात आलेला सेक्स हा सुरक्षित असू शकतो. दाम्पत्यांना तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही, जोवर गर्भधारणेत काही मोठी समस्या नसेल. गर्भपाताचा धोका त्याचवेळी असतो, ज्यावेळी ब्लिडींग जास्त प्रमाणात होतं. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी तातडीनं संपर्क साधणं गरजेचं आहे.

गर्भधारणेत कधी सेक्स करु नये?

  1.  ब्लिडींग जास्त असेल किंवा एमनॉयटिक फ्लूड लीक होत असेल तर सेक्स करु नये, आणि तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा.
  2.  गर्भ कमकुमवत असेल तर सेक्स करण्याचा विचार सोडून द्यावा, आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहावं
  3. जर तुमचा आधीही गर्भपात झालेला असेल, तर सेक्स करणं धोकादायक असू शकतं
  4. गर्भात जुळी वा तिळी बाळं असतील, तर अशा परिस्थितीत सेक्स करणं टाळावं, यामुळं समस्या निर्माण होऊ शकते.

इतर बातम्या :

ओमिक्रॉनचा 89 देशांत शिरकाव, ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत 93 हजार कोरोनाबाधित!

‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.