17500 रुपयांचा सँडविच, त्यावर बटरच 8000 रुपयांचे, तरीही ऑर्डर दिल्यानंतर 48 तासांनी मिळणार

सँडविच हा झटपट होणारा विशेष नास्ता. यामुळेच घराघरात तो लोकप्रिय नास्ता प्रकार आहे. परंतु जगात सर्वात महाग सँडविच न्यूयार्कमध्ये मिळत आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे हे सँडविच खाण्यासाठी तुम्हाला ४८ तास आधी ऑर्डर द्यावी लागणार आहे.

17500 रुपयांचा सँडविच, त्यावर बटरच 8000 रुपयांचे, तरीही ऑर्डर दिल्यानंतर 48 तासांनी मिळणार
sandwichImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 2:14 PM

न्यूयॉर्क : खवय्ये असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. परंतु हा पदार्थ खाण्यापूर्वी आपला खिशा तपासून पाहा. कारण त्याची किंमत तशीच आहे. सध्या एका सँडविचची (sandwich) चर्चा सुरु आहे. हे सँडविच गिनीज बुक वर्ल्ड रिकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. तुम्ही त्याची किंमत शेकडोंमध्ये नाही तर हजारोंमध्ये लावा. कारण त्याची मूळ किंमतच 17500 रुपये आहे. मग या किंमतीत तुम्ही चांगला स्मार्टफोन घेऊ शकतात. परंतु हा सँडविच खाणारे खवय्ये खूप आहेत. यामुळेच त्याची वेटींग मोठी आहे. ऑर्डर दिल्यानंतर 48 तासांनी हे सँडविच मिळणार आहे.

कुठे आहे हे सँडविच

न्यूयॉर्कमधील एका रेस्टोरेंटमध्ये हे सँडविच बनवले जाते. serendipity ने या खास सँडविचचा समावेश आपल्या एजॉटिक फूड मेन्यूमध्ये केला आहे. त्याची किंमत 214 डॉलर म्हणजे 17 हजार 500 रुपये आहे. आतापर्यंत हे जगातील सर्वात महाग सँडविच आहे. यामुळेचे याचे नाव गिनीज बुक वर्ल्ड रिकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे विशेषता

या सँडविचची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे सँडविच खाण्यासाठी तुम्हाला ४८ तास अगोदर ऑर्डर करावी लागेल. डोम पेरिग्नॉन शॅम्पेनने बनलेली फ्रेंच पुलमन शॅम्पेन ब्रेडचा वापर केला आहे. यामध्ये 23 कॅरेट एडिबल गोल्डही आहे. त्याच्या ब्रेडमध्ये खूप महाग ट्रफल बटर लावले आहे. तसेच पांढर्‍या ट्रफल ऑइलचा वापर यासाठी केला आहे. त्यात कॅसिओकावलो पोडोलिको पनीर लावले आहे. यामुळे याची चव सतत तोंडात राहते. यासाठी ज्या बटरचा वापर केला आहे त्याची किंमत 8000 रुपये आहे.

खवय्यांसाठी कोणत्याही गोष्टींची किंमतीला महत्व नसते. मग त्यांना आवडलेली वस्तू खाण्यासाठी ते किती लांब जातात आणि कितीही खर्च करतात. त्यांना शहरातील अन् परिसरातील सर्व चांगल्या हॉटलेस, रेस्टारंट आणि त्याठिकाणी मिळणाऱ्या मेन्यूची माहिती असते. मग आता या मेन्यूत हे विशेष सँडविचचा समावेश करता येईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.