सैंधव मीठ खाणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
जवळपास सर्वजण उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर करतात. सैंधव मीठ खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मुंबई : जवळपास सर्वजण उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर करतात. सैंधव मीठ खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पोट फुगण्यापासून वजन वाढण्यापर्यंत, शरीरात पाणी होणे, जास्त प्रमाणात मीठ खाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, सैंधव मीठ खाल्ल्याने या कोणत्याही समस्या निर्माण होत नाही. यामुळे आहारात सैंधव मीठाचा समावेश आहारात केला पाहिजे. (Sendha Eating salt is beneficial for health)
सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात. हे मीठ नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त सैंधव मीठामध्ये कमी खारटपणा आणि आयोडीनचे प्रमाण कमी असते, यामुळे उच्च रक्तदाब आणि डोळ्यांच्या सूजची समस्या नियंत्रित होते.
उपवासाला खाल्ले जाते
खरं तर, सैंधव मीठामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करण्यात येत नाही. म्हणूनच उपवासाच्या दिवशी हेच मीठ खाल्ले जाते. याशिवाय, या मीठामध्ये भरपूर पोषक घटक असतात. सैंधव मीठामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम यासह अनेक पौष्टिक पदार्थ असतात. म्हणून हे मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हे फायदे आहेत
1. सैंधव मीठ हलके आणि पचणासाठी अत्यंत चांगले आहे, यामुळे पचन प्रणाली सुधारते. याव्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणाली देखील चांगली होते.
2. सैंधव मीठाचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते. कारण शरीराला आवश्यक पोषक आणि खनिज पदार्थ सैंधव मीठामध्ये आढळतात.
3. सैंधव मीठाचा आहारात समावेश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते. याव्यतिरिक्त, हे शरीरातील पीएच पातळी राखण्यासाठी देखील प्रभावी आहे.
4. सैंधव मीठ शरीरातील चरबी कमी करण्यास देखील फायदेशीर आहे. जर आपले वजन वाढले असेल तर आपण आहारात सैंधव मीठाचा समावेश केला पाहिजे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?
Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Sendha Eating salt is beneficial for health)