Skin Care Tips | नितळ-निरोगी आणि सुंदर त्वचा हवीय? मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.
मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी सौम्य क्लीन्सरचा वापर केला पाहिजे (Skin Care Tips For Healthy natural glowing skin).
उत्पादनांमध्ये उपस्थित रासायने आणि अल्कोहोलचे प्रमाण आपली त्वचा कोरडी करते. कोरडी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ओट्स आणि मधाचा देखील वापर करू शकता. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चराइज्ड राहील. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवेल. आंघोळ केल्यावर नेहमीच मॉइश्चरायझर वापरा. यामुळे, तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. मॉइश्चरायझर आपली त्वचा निरोगी ठेवतो.
कोमट पाण्याने अंघोळ करा. बर्याच लोकांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. मात्र, ही सवय चुकीची आहे. नेहमी सौम्य कोमट पाण्यानेच आंघोळ करावी. गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमची त्वचा कोरडे होते. कोमट पाण्याने आंघोळ करणे आपल्यासाठी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. बरेच लोक साबणाने तोंड धुतात. साबणामुळे आपल्या चेहर्याची त्वचा कोरडी होते. म्हणून फेस वॉश करून चेहरा धुण्याची सवय लावा. फेसवॉश आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवतो. तसेच फेसवॉश निवडताना आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्या.
चेहरा हलक्या हातांनी स्क्रब करा. त्वचेवरील मृत त्वचेचा थर काढून टाकण्यासाठी हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करावा. हलक्या हातांनी नेहमी चेहरा घासा. जर, आपण हातांनी जास्त जोर दिल्यास चेहऱ्यावर पुरळ उठू शकते (Skin Care Tips For Healthy natural glowing skin).
कोरडे आणि स्वच्छ टॉवेल्स वापरा नेहमी आंघोळीनंतर स्वच्छ आणि कोरडे टॉवेल्स वापरायला हवेत. गलिच्छ किंवा अस्वच्छ टॉवेल्सच्या वापरामुळे पुरळ, फंगल इन्फेक्शन आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून त्वचा नेहमीच निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ टॉवेल्सचा वापर केला पाहिजे.
क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा. आपण स्किनकेअर उत्पादने जास्त वापरत नसाल तरी, किमान मूलभूत स्किनकेयर नित्यक्रम दररोज पाळलेच पाहिजेत. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील. ही उत्पादने निवडताना प्रथम आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. त्यानुसारच उत्पादने खरेदी करा.
अन्यथा कितीही महागडी उत्पादनामुळे आपल्याला फरक दिसणार नाही. त्वचेवर टोनर लावण्यासाठी सॉफ्ट कॉटन बॉल वापरा. त्यानंतर क्लीन्झर वापरून चेहऱ्यावरील धूळ, घाण काढून टाका. शेवटी मॉइस्चरायझर लावा. याने आपल्या त्वचेला चमक येईल. यासह, आठवड्यातून किमान दोनदा त्वचेला एक्सफोलिएट करण्यास विसरू नका. याशिवाय उन्हात बाहेर पडण्यापूर्वी एसपीएफ असलेले सनस्क्रीन जरूर वापरा.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Skin Care Tips For Healthy natural glowing skin)