हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्या… हे घरगुती उपाय करायला विसरू नका!

मुंबई : हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात. त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यावी, हे अनेकांना माहित नसते. या काळात त्वचा कोरडी पडते, भेगा पडतात. यासाठी लोक अनेक प्रकारच्या क्रिम वापरतात किंवा अनेक उपायही करतात.(Skin care Tips for […]

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्या... हे घरगुती उपाय करायला विसरू नका!
त्वचेवरील रेडनेस कमी करण्यासाठी घरगुती उपाय
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 4:52 PM

मुंबई : हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात. त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यावी, हे अनेकांना माहित नसते. या काळात त्वचा कोरडी पडते, भेगा पडतात. यासाठी लोक अनेक प्रकारच्या क्रिम वापरतात किंवा अनेक उपायही करतात.(Skin care Tips for winter Season)

आपण आपल्या शरीराकडे जितके लक्ष देतो तितके लक्ष आपण त्वचेकडे देत नाहीत. प्रदूषणामुळे त्वचेचे मोठे नुकसान देखील होते. चेहऱ्यासोबतच शरीराच्या त्वचेची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, त्वचेची काळजी नेमकी घ्यायची कशी? काळजी करू नका घरचे घरी तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकतात.

गरम पाण्याऐवजी उबदार अंघोळ करा हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने आपली त्वचा कोरडी व निर्जीव दिसते. यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. पाणी कोमट झाल्यावर नेहमी शॉवर घ्या. यामुळे तुमची त्वचा मऊ राहील.

त्वचेचीक्लिनिंग जेव्हा त्वचेची काळजी येते तेव्हा क्लिनिंग ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात हरबरा डाळीचे पीठ, एक चमचे हळद, 2 चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल.

नैसर्गिक स्क्रब त्वचेतून काळे डाग काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. स्क्रबिंग आपली मृत त्वचा काढून टाकते. नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी आपण कॉफी, नारळ तेल आणि मध वापरू शकता. आठवड्यातून दोनदा हे स्क्रब लावल्याने मृत त्वचा दूर होईल.

आहाराची काळजी घ्या.

हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या :

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!

(Skin care Tips for winter Season)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.