स्मार्ट वॉच वापरताय? ठरू शकतं जीवघेणं, कसं ते पाहा
आजकाल स्मार्ट वॉचचा ट्रेंडच सुरु आहे. हाताच्या मनगटावरील स्मार्ट वॉच हे आकर्षक दिसत तसेच त्याचे अनेक फायदेही मिळतात. त्यामुळे अनेकजण हे स्मार्ट वॉच अगदी आवडीने घालतात. स्मार्ट वॉचचे फायदे आहेत हे खरं असलं तरीसुद्धा ते तेवढचं धोकादायकही नक्कीच आहे . अनेक कारणाने फायदे देणारं स्मार्ट वॉच जीवघेणेही ठरु शकतं. कसं ते पाहा.

- आजकाल 10 जणांपैकी 7 ते 8 जणांच्या हातात स्मार्ट वॉच नक्कीच पाहायला मिळतं. स्मार्ट वॉचचा ट्रेंडच सुरु आहे. हाताच्या मनगटावरील स्मार्ट वॉच हे आकर्षक दिसत तसेच त्याचे अनेक फायदेही आहेत. बरेचजण हे स्मार्ट वॉच अगदी आवडीने घालतात.
- स्मार्ट वॉचचे फायदे आहेत हे खरं असलं तरीसुद्धा ते तेवढचं धोकादायकही नक्कीच आहे हे मात्र काहीजणांना माहित नसेल. मनगटावरील हे स्मार्ट वॉच जीवघेणेही ठरु शकते. स्मार्ट वॉचचा आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो.
- जगातील काही ब्रँड्सच्या स्मार्ट वॉचेस जीवघेण्या आजाराला आमंत्रण देण्याला कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या स्मार्ट वॉचेसमुळे कर्करोगासारखा घातक आजार उद्भवण्याचा धोका वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.
- नुकतंच, अमेरिकेत 15 स्मार्ट वॉच ब्रँड्सचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात स्मार्ट वॉचच्या निर्मितीमध्ये काही घातक रयायनांचा वापर करण्यात आल्याचं आढळून आलं. यात परफ्लुओरोक्लिल आणि पॉलिफ्लुओरोक्लिल सबस्टन्सेस या घातक रयायनांचा समावेश असल्याचं समोर आलं. धोकादायक रसायने कॅन्सरसारख्या आजाराला नक्कीच कारणीभूत ठरतात.
- अॅपल कंपनीने मात्र यावर त्यांचं मत मांडलं आहे. अॅपल या स्मार्ट वॉच कंपनीच्या मते, त्यांच्या उत्पादनात फ्लुरोइलास्टोमर या घटकाचा वापर केला जातो. फ्लुरोइलास्टोमर हे एक कृत्रिम रबर असून त्याचा शरीराला धोका निर्माण होत नाही. त्यात फ्लोरिन हा घटक असून ‘पीएफएएस’ ही घातक रसायने नसतात.
- या स्मार्ट वॉचमधील रसायने मानवी आरोग्याला धोकादायक ठरणार नाहीत याची खात्री करुनच ती उत्पादनात वापरली जातात.असही कंपनीने म्हटल आहे.
- अॅपल कडून स्मार्ट वॉचच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रबरमध्ये ‘पीएफएएस’ ही रसायने असतात, जी लपवून वापरली जातात. यामुळे जीवघेण्या आजारांचा धोका उद्भवत असल्याचं याचिकाकर्त्यांनी मांडलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे आता हा एक वादाचा आणि योग्य त्या रिसर्चचा मुद्दा बनला आहे.
- तसेच स्मार्ट वॉचमध्ये वापरण्यात येणाऱ्या घातक रसायनांमुळे मुत्रपिंडाशी संबंधित आजार, प्रजनन समस्या तसेच मुत्राशयाच्या कर्करोगाच्या आजाराचा धोका वाढतो असं म्हटलं जातं आहे.
- (डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून घेण्यात आलं आहे. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा)