केस धुतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चिकट होतात? मग हा सोपा उपाय करा आणि दिसा सुंदर
केस धुतल्याच्या लगेचच दुसऱ्या दिवशी चिकट होतात. मग अशावेळी रोज केस धुणे पण शक्य नाही. मग यावर काही करता येईल का?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. हे घरगुती हेअरमास्क वापरा आणि केसाचं सौंदर्य वाढवा.
अनेक लोकांना तेलकट केसाची समस्या असते. यामुळे त्यांना सतत केस धुवावे लागतात. तरीदेखील केस धुतल्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचे केस चिकट होतात. पावसाळ्यात ऑयली स्कॅल्पची समस्या अधिक जाणवते. पावसाळ्यात केस अधिक चिकट आणि तेलकट होतात. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण रोज केस धुवू शकत नाही. मग अशामुळे केस चिकट आणि तेलकट होतात आणि यामुळे केस गळण्याची समस्या सुरु होते. त्यात आपण केस निरोगी राहण्यासाठी ऑयलिंग पण नियमित करु शकत नाही. मग अशावेळी आपल्या केसाचं सौंदर्य वाढविण्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आज आपण असे हेअरमास्क पाहणार आहोत जे तुम्हाला या समस्येपासून मुक्ती देतील.
ऑयली स्कॅल्पसाठी घरगुती उपाय
1. केस निरोगी राहावे, सुंदर, मजबूत आणि चमकदार दिसावे म्हणून सर्वप्रथम आहार महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसंच बाजारात मिळणारे उत्पादनांपेक्षा नैसर्गिक गोष्टी केसांसाठी जास्त लाभदायक असतात. 2. केसांना ऑयलिंग हे खूप महत्त्वाचं असतं. खोबरेल तेल आणि लिंबू हे केसांसाठी खूप फायदेशीर असतं. एका वाटीत 2 चमचे खोबरेल तेल, लिंबूचे 4-5 थेंब आणि त्यात 3-4 थेंब लॅव्हेंडर तेल घाला. हे मिश्रण साधारण 4-5 तास लावून ठेवा आणि केस धुवा. 3. काही लोकांचा समज आहे की तेलकट केस असेल तर कंडिशनर वापरायचा नसतो. पण डॉक्टरच्या मते तेलकट केस असलेल्यांनाही कंडिशनरचा वापर करावा. मात्र कंडिशनर नेहमी लाइट असावं. 4. एक चमचा पाण्यात 10 थेंब पचौली एसेंशियल ऑयल असं मिश्रण बनवा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावून ठेवा. अर्धा तासाने केस धुवा. 5. केस चिकट होतात यासाठी एप्पळल साइडर व्हिनेगरचा उपयोग करा. एका मगमध्ये 1 चमच एप्पाल साइडर व्हिनेगर टाका. केस धुताल्यानंतर या मगने केस धुवा. असं केल्यास तुमचे केस चमकदार होतील आणि चिकटपणाही दूर होणार.