साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज करा स्टीव्हियाचे सेवन, जाणूनघ्या स्टीव्हियाचे गुणकारी फायदे

आपण देखील मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करू इच्छित असल्यास आपण स्टीव्हिया घेऊ शकता. अनेक संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की स्टीव्हिया हा मधुमेहासाठी रामबाण उपाय आहे. (Take stevia daily to control sugar, know the health benefits)

साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज करा स्टीव्हियाचे सेवन, जाणूनघ्या स्टीव्हियाचे गुणकारी फायदे
साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज करा स्टीव्हियाचे सेवन
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 5:29 PM

नवी दिल्ली : मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, खराब दिनचर्या, अयोग्य आहार आणि चुकीच्या आहारामुळे बर्‍याच रोगांचा जन्म होतो, त्यातील एक मधुमेह आहे. हा रोग रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे होतो. तसेच पॅनक्रिएटिक इन्सुलिन हार्मोन थांबते. यासाठी औषधे टाळणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपण देखील मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करू इच्छित असल्यास आपण स्टीव्हिया घेऊ शकता. अनेक संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की स्टीव्हिया हा मधुमेहासाठी रामबाण उपाय आहे. (Take stevia daily to control sugar, know the health benefits)

स्टीव्हिया म्हणजे काय?

स्टीव्हिया जगभरातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक गोडव्यासाठी वापरली जाते. हे स्टीव्हिया वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. सामान्यतः बोली भाषेत लोक त्याला गोड पाने म्हणतात. याचे सेवन करुन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाते. 2011 च्या एका संशोधनानुसार, स्टीव्हियामध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म आहेत. यासोबतच यात क्षती बीटा पेशीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील गुणधर्म आहेत. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी स्टीव्हिया खूप फायदेशीर आहे.

असे करा सेवन

तज्ज्ञांच्या मते दररोज स्टीव्हिया पावडर घेतल्यास मधुमेहामध्ये लवकरच आराम मिळतो. यासाठी अर्धा ग्रॅम स्टेव्हिया पाण्यात किंवा दुधात मिसळा आणि दररोज त्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. साखरेपेक्षा 20 पट जास्त गोडपणा देखील देतो. हे इतर अनेक रोग निर्मूलन करण्यास सक्षम आहे.

स्टीव्हियातील पोषक तत्वे

स्टीव्हिया प्रामुख्याने साखरेला पर्याय म्हणून वापरला जातो, जो नैसर्गिक गोडपणा मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. याव्यतिरिक्त, स्टीव्हियामध्ये फ्लेव्होनॉइड्स, ट्रायटरपेन, टॅनिन, कॅफिक अॅसिड, कॅफिनॉल आणि क्वेरेसेटिनसारख्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. स्टीव्हिया वनस्पतीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील असतात. स्टीव्हियात उपस्थित लहान सेंद्रिय संयुगे आरोग्यासाठी एक महत्वाची भूमिका निभावतात.

वजन कमी करण्यास उपसुक्त

शरीराचे वाढते वजन खूप आजारांना कारणीभूत ठरू शकते. परंतु स्टीव्हियाचे फायदे वजन कमी करण्यास उपयुक्त आहेत. जास्त वजन किंवा लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत जसे की शारीरिक श्रमांची कमतरता, गोड आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे इत्यादी. एका अभ्यासानुसार, शरीराच्या गरजेपेक्षा जास्त साखर सेवन केल्याने सुमारे 16 टक्के कॅलरी वाढते. ज्यामुळे शरीराचे वजन अधिक वेगाने वाढू शकते. तथापि, या परिस्थितीत स्टीव्हिया घेणे फायदेशीर आहे. स्टीव्हियात कॅलरी खूप कमी असल्याने त्याचा शरीरातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होत नाही. याचाच अर्थ असा आहे की ज्यांना वजन कमी करायचे आहे ते नियमितपणे स्टीव्हियाचे सेवन करू शकतात. (Take stevia daily to control sugar, know the health benefits)

इतर बातम्या

स्ट्रॉबेरी खाणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !

डेंटल इम्प्लांट्स केल्यानंतर ‘हे’ पदार्थ खाताय? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतायत…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.