हिवाळ्यात रक्त पातळ करण्यासाठी मदत करतील या 3 घरातील गोष्टी
हिवाळ्यात वातावरण थंड असते. वातावरणात गारवा आला की, हृदयविकाराचा आजार असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असते. हिवाळ्यात ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी रक्त गोठू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय देखील सांगणार आहोत.
रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय : हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. हिवाळा सुरु होताच हृदयविकाराच्या रुग्णांनी आपल्या आहारात बदल करण्याची आवश्यकता असते. ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल अशा लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असते. रक्त घट्ट होऊ नये म्हणून औषधे डॉक्टरांकडून दिले जातात. पण तुम्ही आहारात देखील बदल केला पाहिजे.
रक्त घट्ट का होते?
हिवाळा सुरु झाला की, आपले रक्त घट्ट होते. पुढे जाऊन जर रक्त गोठले तर हृदयविकाराचा झटका य़ेऊ शकतो. क्लोटिंगमुळे थंडीत हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो. हृदयावर रक्त पंप करण्याचा दबाव वाढतो. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. संसर्गाशी लढण्याच्या आपल्या शरीराच्या क्षमतेवरही याचा परिणाम होतो. म्हणूनच न्यूमोनियासारख्या संसर्गामुळे सर्दीमध्ये अधिक मृत्यू होतात कारण फुफ्फुसाची स्थिती आणि खोकला अधिक गंभीर समस्या बनतात.
1. हळद
रक्त पातळ करण्यासाठी हळदीचा वापर केला जाऊ शकतो. कर्क्युमिन हा हळदीमधील सक्रिय घटक आहे आणि त्यात दाहक-विरोधी आणि रक्त पातळ करणारे गुणधर्म आहेत. हिवाळ्यात चहामध्ये किंवा सूपमध्ये तुम्ही हळद घालून पिऊ शकता. यामुळे तुमचे रक्त पातळ होण्यास मदत होईल.
2. आले
आलेममध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आले हा एक दाहक-विरोधी मसाला आहे जो रक्त घट्ट होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करू शकतो. आल्यामध्ये सॅलिसिलेट्स असतात जे ऍस्पिरिनसारखे रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. तुम्ही चहा, स्मूदी आणि ज्यूसमध्ये आल्याचा समावेश करु शकता.
3. दालचिनी
दालचिनीमध्ये कौमरिन हे रक्त पातळ करणारे घटक असते. वॉरफेरिन, सामान्यतः वापरले जाणारे रक्त पातळ करणारे औषध आहे जे कौमरिनपासून बनवले जाते. दालचिनीचा चहा किंवा पाणीमध्ये वापर करु शकता. रक्त पातळ करण्यास प्रभावीपणे हे मदत करू शकते. हिवाळ्यात तुमच्या हृदयाची काळजी घ्या.
सूचना – वरील माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला