फ्रिझी केसांपासून सुटका मिळवायचीये? वापरा ‘हे’ 5 होममेड हेअर मास्क

रेशमी आणि निरोगी केस प्रत्येकालाच हवे असतात. पण अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे केस एकदम फ्रिझी होतात, जे खूप वाईट दिसतात. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही होममेड रात्रभर हेअर मास्क ट्राय करू शकता ज्यामुळे केसांची समस्या दूर होईल आणि केसांना नवी चमक मिळेल.

फ्रिझी केसांपासून सुटका मिळवायचीये? वापरा 'हे' 5 होममेड हेअर मास्क
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 2:51 PM

निरोगी आणि सुंदर केस असणे हे प्रत्येक स्त्रियांच्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग आहे हे सर्वांनाच माहित आहे, परंतु आजकालच्या प्रदूषणामुळे धूळ आणि हवामानातील बदलांमुळे केस तुटणे आणि कोरडे पडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा हवेतील आर्द्रता कमी होते, तेव्हा केसांमध्ये फ्रिझीनेस समस्या वाढते. केसांच्या उद्भवणाऱ्या समस्यांसाठी प्रत्येकजण अनेक उत्पादने आणि उपचारांचा आधार घेतात. परंतु हे उपाय फक्त थोड्या काळासाठी केसांवर काम करतात. जर तुम्हाला तुमचे केस सॉफ्ट आणि चमकदार आणि निरोगी दिसावेत असे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या केसांना आतून पोषण देणे गरजेचे आहे.

तुमच्या केसांना निरोगी बनवण्यासाठी रात्रभर हेअर मास्क हा एक उत्तम मार्ग आहे, जो केसांना ओलावा आणि चमक तर देतोच, शिवाय त्यांना फ्रिझी होण्यापासून देखील रोखतात. रात्रभर हेअर मास्क तुमचे केस मऊ करतात आणि ओलावा टिकवून ठेवतात, ज्यामुळे ते दाट आणि मजबूत बनतात. आज आम्ही तुम्हाला असे 5 उत्तम हेअर मास्क सांगणार आहोत, जे रातोरात तुमचे फ्रिझी केस चांगले करू शकतात.

एरंडेल तेल आणि नारळ तेलाचे हेअर मास्क

कस्टर ऑइल आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण केसांसाठी उत्तम उपचार आहे. हे दोन्ही तेल केसांना खोलवर पोषण देण्याचे आणि फ्रिझीनेस नियंत्रित करण्याचे काम करतात. नारळाचे तेल केसांना मऊ करते, तर एरंडेल तेल केसांच्या वाढीस उत्तेजन देते आणि त्यामध्ये ओलावा टिकवून ठेवते.

हे सुद्धा वाचा

बनवण्याची पद्धत : २ चमचे खोबरेल तेल आणि १ चमचा एरंडेल तेल मिक्स करा. ते हलके गरम करा आणि नंतर केसांच्या मुळापासून टोकापर्यंत चांगले लावा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाका.

एवोकॅडो आणि मधाचा हेअर मास्क

एवोकॅडोमध्ये फॅटी ॲसिड असते, जे केसांना खोलवर पोषण देते. त्याचबरोबर मध केसांना हायड्रेट करते आणि केसांना चमक आणते. या मास्कमुळे केस मऊ आणि फ्रिझी फ्री राहतात.

बनवण्याची पद्धत : १ पिकलेला एवोकॅडोचा गर घ्या आणि १ चमचा मध चांगले मिक्स करा. हे केसांना लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.

ऑलिव्ह ऑइल आणि अंड्याचे हेअर मास्क

ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केस निरोगी ठेवतात. अंड्यात प्रथिने असतात, जी केसांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतात. हा मास्क लावल्याने केस मऊ, चमकदार आणि फ्रिझी फ्री होतात.

बनवण्याची पद्धत : २ अंडी आणि २ चमचे ऑलिव्ह ऑईल हे मिश्रण मिक्स करा. यानंतर केसांना चांगले लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा. याचा परिणाम तुम्हाला एकाच वॉशमध्ये दिसेल.

बांबू तेल आणि कोरफड मास्क

कोरफडीचे फायदे सर्वांनाच माहित आहेत. तसेच डोक्याच्या स्कॅल्पला शांत करते आणि केसांना ओलावा प्रदान करते. बांबू तेलाचे गुणधर्म केसांना मजबूत करतात आणि केस फ्रिझी होण्यापासून नियंत्रण ठेवतात. हे हेअरमास्क केसांसाठी अतिशय प्रभावी आहेत.

बनवण्याची पद्धत : २ चमचे कोरफड जेल आणि १ चमचा बांबूचे तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवा.

दही आणि लिंबाचा मास्क

दहीमध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड केसांना मऊ आणि सॉफ्ट बनवते, तर लिंबाचा रस टाळूतील घाण आणि तेल काढून टाकते. हा मास्क केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतो आणि फ्रिझी होण्यापासून वाचवतो.

बनवण्याची पद्धत : २ चमचे दही आणि १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे केसांना चांगले लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी उठून शॅम्पूने केस धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...