अयोध्येशिवाय देशभरात या ठिकाणीही श्रीरामाची भव्य मंदिरं; एकाला म्हणतात ‘दक्षिणेतील अयोध्या’

अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच गर्दी होऊ लागली आहे. अयोध्येशिवाय भारतात इतरही ठिकाणी प्रभू श्रीराम यांची भव्य मंदिरं आहेत. ही मंदिरं कुठे आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते जाणून घेऊयात..

अयोध्येशिवाय देशभरात या ठिकाणीही श्रीरामाची भव्य मंदिरं; एकाला म्हणतात 'दक्षिणेतील अयोध्या'
Sri Ram TemplesImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 2:06 PM

मुंबई : 23 जानेवारी 2024 | सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. प्राणप्रतिष्ठेनंतर मंगळवारपासूनच हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. दुसऱ्याच दिवशी हजारो रामभक्तांनी अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर दर्शनासाठी जरी खुलं झालं असलं तरी अद्याप त्याचं संपूर्ण बांधकाम झालेलं नाही. सोमवारी या मंदिराचे विविध आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अयोध्येत ज्याप्रकारे प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर बांधलं गेलंय, तसंच देशात इतरही ठिकाणी रामाची मंदिरं आहेत. ही मंदिरं कुठे आहेत, ते पाहुयात..

सीता रामचंद्र स्वामी मंदिर, तेलंगणा

तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेम इथल्या भद्राचलम याठिकाणी सीता रामचंद्र स्वामी मंदिर आहे. हे मंदिर देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा संबंध रामायण काळापासून असल्याचं मानलं जातं. या मंदिराला ‘दक्षिणेतील अयोध्या’ असंही म्हटलं जातं.

राम राजा मंदिर, मध्यप्रदेश

मध्यप्रदेशमधील ओरछा याठिकाणी असलेलं राम राजा मंदिर हे एकमात्र असं मंदिर आहे, जिथे भगवान राम हे राजाच्या रुपात विराजमान आहेत. याठिकाणी त्यांना रोज गार्ड ऑफ ऑनरसुद्धा दिलं जातं. या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्यासोबतच माता सीता, लक्ष्मण, हनुमान, देवी दुर्गा, सुग्रीव आणि जामवंत यांचीही पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

रामतीर्थ मंदिर, पंजाब

पंजाबच्या अमृतसरमध्ये असलेल्या रामतीर्थ मंदिराचाही संबंध रामायण काळापासून असल्याचं मानलं जातं. या मंदिराशी संबंधित असलेली कथा ही प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचे पुत्र लव-कुश यांच्याशी जोडलेली आहे. याच ठिकाणी महर्षी वाल्मिकी यांनी सीता मातेला आश्रय दिलं होतं, असंही मानलं जातं.

त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात करुवन्नूर नदीच्या काठी श्री रामस्वामी मंदिर आहे. याठिकाणी श्रीराम यांची सहा फूट उंची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. या मंदिरात शंकर, गणपती आणि कृष्ण यांचीही पूजा केली जाते.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.