Travel: एकूण 32 पर्यटनस्थळांवर बंदी! पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, वाचा नियम

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये यासाठी खालापूर व कर्जत तालुक्यातील गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेला आहे.

Travel: एकूण 32 पर्यटनस्थळांवर बंदी! पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, वाचा नियम
एकूण 32 पर्यटनस्थळांवर बंदी!
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 9:45 AM

अलिबाग: पावसाळा (Rainy Season) म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीच! सुट्टीच्या दिवशी, कधी कधी तर आवर्जून सुट्टी काढून लोकं पावसाळ्यात भटकंती करायला जातात. काही पर्यटनाची ठिकाणं मात्र पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली जातात. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक ठिकाणी पर्यटक येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण (Dams) व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये यासाठी खालापूर व कर्जत (Khalapur Karjat) तालुक्यातील गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेला आहे.

प्रतिबंधात्मक आदेशानुसार,

  • पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे
  • मद्य बाळगणे
  • मद्य वाहतूक करणे
  • अनधिकृत मद्य विक्री करणे
  • उघड्यावर मद्य सेवन करणे
  • पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास
  • कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे
  • रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे
  • पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे
  • सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत धबधबे किंवा तलाव या ठिकाणी पाण्यात उतरणे
  • वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे
  • वाहन अतिवेगाने चालविणे
  • वाहतूकीस परिणाम, अडथळा होईल अशा प्रकारे वाहन चालविणे या सगळ्यास बंदी आहे.

दि. 10 जून ते दि. 9 ऑगस्ट 2022 कालावधीसाठी बंदी आदेश

आदेश मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. दि. 10 जून ते दि. 9 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कर्जत तालुक्यांतील 18 आणि खालापूर तालुक्यातील 14 अशा एकूण 32 पर्यटनस्थळे व परिसरात आजवर घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांकरिता बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

● खांडस धरण

हे सुद्धा वाचा

● पाषाणे धरण

● पाली भूतिवली

● डोंगरपाडा धरण

● बेकरे कोल्हा धबधबा

● बेडीसगाव धबधवा

● आनंदवाडी धवधवा

● मोहिली धवधवा

● आषाणे कोषाणे धबधबा

● पळसदरी धरण

● कोंढाणे धवधवा

● अवसरे धरण

● साळोख धरण

खालापूर बंदी लागू पर्यटनस्थळे

● धामणी कातकरवाडी तलाव

● पोखरवाडी बंधारा बोरगाव

● आडोशी धवधवा व परिसर

● मोरबे धरण

● बोरगाव धबधवा

● कोमलवाडी धबधबा

● टपालवाडी धबधबा

● जुम्मापट्टी धबधबा

● वदप धबधबा

● पळसाचा बंधारा

● डोणवत धरण

● सोलनपाडा धरण

● माडप धबधबा

● झेनिथ धवधवा व परिसर

● आडोशी पाझर तलाव

● नढाळ / वरोसे धरण

● बावलें बंधारा

●कलोते धरण

● भिलवले धरण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.